Gauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग
हिमायतनगर, अनिल मादसवार| गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरसह परिसरातील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. देवी गौरी व गणेशाच्या आगमनासाठी लागणारे फुलांचे हार, आकर्षक मूर्ती, सजावटीच्या वस्तू, मिठाई, कपडे, दागदागिने यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे.
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन बुधवारी मोठ्या जल्लोषात होणार असून, त्याचसोबत दोन दिवसात गौरी महालक्ष्मीच्या आगमन होणार असल्याने घरोघरी तयारी केली जात आहे. उत्सवाला अवघे काही दिवस बाकी असताना बाजारात गणपतीच्या सुबक मूर्ती, गौरीचे मुखवटे व पूजेचे साहित्य दाखल झाले आहे.
उत्सवानिमित्त विशेषतः गृहिणींची बाजारपेठेत मोठी लगबग दिसून येत असून, यंदा बाजारात गौरी सजावटीसाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक पत्र्यांच्या कोठ्यांऐवजी पुणेरी स्टँड, सजावटीचे मखर आणि आकर्षक साज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ३०० ते ७०० रुपयांदरम्या...
