नवीन नांदेड़ l भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते वर्षभर उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला, यावेळी उपायुक्त यांच्या सह सहाय्यक आयुक्त व विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थितीती होती.


मागील वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल वर्षातील सर्वोत्तम अधिकारी हा पुरस्कार मुख्य उद्यान अधिक्षक, तथा सिडको क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त आपत्ती व्यस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग यांना आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सिडको क्षेत्रीय कार्यालययातील र्अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


