HomeनांदेडOnline Farmer Scientist Dialogue | 2 ऑगस्ट 2024 रोजी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ...

Online Farmer Scientist Dialogue | 2 ऑगस्ट 2024 रोजी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे आयोजन – NNL

नांदेड| वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरु यांच्या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाचे उद्या शुक्रवार 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात सद्यपरिस्थितीत ‘सोयाबीन, कपाशीवरील किड व्यवस्थापन’ या विषयावर माहिती देण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, संबंधित कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमाची लिंक प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना पिकावरील किड याबाबत योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. हा शेतकरी संवाद कार्यक्रम दर शुक्रवारी ऑनलाईन होणार असून शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाची लिंक उपलब्ध करुन घेण्यासाठी दर आठवड्याला गावातील संबंधित कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments