नांदेड| शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दि.18 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी, कै.रामेश्वरभाऊ तिवारी व्यासपीठ मारवाडी धर्मशाळेसमोर हनुमानपेठ वजिराबाद नांदेड येथे सायंकाळी 4 वाजता दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीमध्ये विजेत्या स्पर्धकास 55 हजार पाचशे 55 रूपये बक्षीस देण्यात येणार असून इच्छूक दहीहंडी टिमचे यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन संयोजक शिवसेना महानगरप्रमुख मनोज यादव यांनी केले आहे.


या दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख (नांदेड-हिंगोली) बबनराव थोरात यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर तर विशेष पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा.रविंद्रभाऊ चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार, अप्पर जिल्हाधिकारी किरण अंबेकर, पोलीस उपअधिक्षक सुरजकुमार गुरव, तहसिलदार संजय वारकड, प्रजावाणीचे संपादक गोवर्धन बियाणी, सामनाचे विजय जोशी,

शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख बबन बारसे, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे, महिला जिल्हाप्रमुख निकीताताई चव्हाण, दक्षिण महिला जिल्हाप्रमुख वत्सलाताई पुयड, माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत. सदरील दहीहंडी कार्यक्रमास सर्व नांदेडकरांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजक शिवसेना महानगरप्रमुख मनोज यादव यांनी केले आहे.



