नवीन नांदेड l शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोचे जेष्ठ शिक्षक डॉ. आण्णासाहेब गरड यांना इंदिरा गांधी हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.
डॉ.आण्णासाहेब गरड यांनी इंदिरा गांधी हायस्कूल येथे जवळपास एकोणतीस वर्ष भूगोल विषयाचे अध्यापन केले तर डॉक्टरेट च्या माध्यमातून भूगोल या विषयात नांदेड जिल्ह्याच्या आर्थिक विकासात साखर कारखान्यांची भूमिका एक भौगोलिक अभ्यास वर सखोल समजपयोगी संशोधन केले आहे. डॉ.गरड इतर शैक्षणिक संशोधन व नियुक्त्या खालील प्रमाणे आहेत.


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण मंडळ पुणेच्या महाराष्ट्र राज्य नवीन शैक्षणिक धोरण NEP-2020 निर्मिती सदस्य,( इयत्ता तिसरी ते बारावी), महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती सदस्य (इयत्ता नववी ते बारावी), दीक्षा ॲपचे समिक्षण, आर्थिक साक्षरता अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य, शिक्षक प्रशिक्षण कार्यपुस्तिका विकसन सदस्य, इयत्ता दहावी भूगोल सेतू अभ्यासक्रम लेखन, एम.फिल मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील बीए तृतीय वर्षाच्या भूगोल प्रात्यक्षिक विषयाच्या अध्यापनात व अध्ययनात येणाऱ्या समस्यांचा अभ्यास केलेला आहे.

एम.ईडमध्ये इयत्ता नववीच्या भूगोल अध्यापनात नकाशा वापराच्या परिणाम कारकतेचा अभ्यास डिएसएम मध्ये इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील इयत्ता आठवीच्या भूगोल विषयाच्या अध्यापना साठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आणि वापर याचा चिकित्सक अभ्यास केलेला आहे, इतर संशोधनकार्य त्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादरीकरण व प्रकाशित केलेले आहेत.तसेच अनेक वर्णन पत्रातून शैक्षणिक लेख प्रकाशित झाले आहेत . त्यांचा महाराष्ट्र शासनाचा ‘माझा वेगळा उपक्रम’ या पुस्तकात भौगोलिक शब्दकोडे एक उपक्रम एक अभ्यास हा लेख निवडला गेला आहे.


तसेच त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन ठरतील असे लेख शिक्षण संक्रमण व जीवन शिक्षणामध्ये प्रकाशित केले आहेत. अश्या प्रकारे एक उच्च विद्या विभूषित, अभ्यासू, शिस्तप्रिय सर्वगुणसंपन्न, व्यक्तिमत्व इंदिरा गांधी हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी लाभले याचा शाळेला मनस्वी आनंद आहे.

त्यांची पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण,उपाध्यक्ष अमिताताई चव्हाण,सचिव डी.पी. सावंत, सहसचिव रावसाहेब शेंदारकर, खजिनदार उदयरावजी निंबाळकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, पांडुरंगराव पावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले

