Thursday, May 14

A winter -like experience : नांदेडमध्ये पावसाळ्यात हिवाळ्यासारखा अनुभव!

नांदेड| राज्यात सध्या पावसाचे जोरदार आगमन झाले असून, गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर आज सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व परिसरात धुके पडत असल्याने नागरिकांना हिवाळ्यासारखा गारवा जाणवत आहे.

IMG 20250804 054143 A winter -like experience : नांदेडमध्ये पावसाळ्यात हिवाळ्यासारखा अनुभव!

आज सकाळपासूनच वातावरणात स्पष्ट बदल जाणवत आहे. पाऊस काहीसा उघडल्याने सकाळच्या प्रहरात धुक्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. थोडासा गारवा, मंद वाऱ्याची झुळूक आणि आकाशात पसरलेलं धुके… यामुळे पावसाळ्यातच हिवाळ्यासारखा अनुभव मिळत आहे. निसर्गाच्या या बदलत्या रूपाचा आनंद घ्या, पण सकाळी व शेत शिवारात जाताना काळजीही घ्या गवत आणि रस्ते ओले आहेत सावधपणे चालत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!