HomeनांदेडVishnupuri ; विष्णुपुरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना छत बांधकामाचा शुभारंभ

Vishnupuri ; विष्णुपुरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना छत बांधकामाचा शुभारंभ

नवीन नांदेड l जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) निधीतून विष्णुपुरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नुतन इमारतीच्या छत बांधकाम कामाचा शुभारंभ जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.राजकुमार दि.पडीले यांच्या हस्ते व सरपंच सौ. संध्या विकास देशमुख व राजु हंबर्डे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे,या बांधकामा मुळे नवीन अद्यावत इमारत तयार होणार आहे.

विष्णुपुरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत विष्णुपुरी , पांगरी, धनगरवाडी,खुपसरवाडी,कल्लाळ, मार्तंड, पिंपळगाव निमजी,गंगाबेट, व भनगी ,राहेगाव,वाहेगाव ,भायेगाव, किक्की,काकांडी, या 14 गावाचा समावेश असुन गेल्या अनेक वर्षांपासून जागा असुन इमारत नसल्याने पशुसंवर्धनची गैरसोय होत असल्याने भव्य इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी सतत पाठपुरावा ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे यांनी केली होती.

अखेर इमारत निधी बाबत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जवळपास रु. 70 लाख निधीतून भव्य इमारत पशुवैद्यकीय दवाखाना जागेत गेल्या मार्च महिन्यात बांधकामाला सुरुवात झाली.

IMG 20250801 WA0004 Vishnupuri ; विष्णुपुरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना छत बांधकामाचा शुभारंभ

यात 5 खोल्यासह रंगरंगोटी,विद्युत व्यवस्था असुन आकर्षक डिझाईन मध्ये इमारत तयार होणार आहे.या इमारत स्लॅबचा भुमी पूजन दि.1आगस्ट रोजी उपायुक्त डॉ.राजकुमार पडिले यांच्या हस्ते तर सरपंच सौ.संध्या विलास हंबर्डे व डॉ. प्रवीणकुमार घुले ,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नांदेड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अविनाश बुन्नावार, उपसरपंच विश्वभर हंबर्डे, ग्रामपंचायत अधिकारी संजय कानडे, मुख्याध्यापिका उज्वला जाधव, पशुधन पर्यवेक्षक योगेश डोंगरे, संतोष हंबर्डे ,उग्रसेन हंबर्डे ,कालिदास बारसे, यांच्या सह गावकरी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments