HomeनांदेडUsmannagar Police : उस्माननगर पोलीसांनी यात्रेत हरवलेल्या दोन वर्षाचे चिमुकलीची व तिच्या...

Usmannagar Police : उस्माननगर पोलीसांनी यात्रेत हरवलेल्या दोन वर्षाचे चिमुकलीची व तिच्या आईची घडवुन आणली भेट

उस्माननगर, माणिक भिसे| पोलीस स्टेशन उस्माननगर हद्दीत दि 29/07/2025 रोजी नागबर्डी देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही खुप मोठया प्रमाणात यात्रा भरली होती. या यात्रेत नांदेड जिल्हयातील तसेच आजु बाजुचे जिल्हयातील सुमारे एक ते दिड लाख भावीक आलेले होते. सदर यात्रेत छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यापारी दुकान लावुन त्यांचे व्यवसाय करतात. यात्रेत भावीकांचे गर्दीत दि 29/07/2025 रोजी दुपारी दोन वर्षाची मुलगी नामे संध्या प्रभाकर राउत हि तिचे आई वडील हे यात्रेत फुगेव्यापार करण्यात मग्न असल्याने खेळत खेळत आपले आई वडीलांपासुन यात्रेत हरवली.

तीस तिचे आई वडील दिसुन येत नसल्याने यात्रेच्या गर्दीत घाबरुन लिंबाचे झाडाखाली रडत उभी असताना यात्रेमधील साध्या वेशातील पोलीस अंमलदार पो.कॉ. प्रकाश पेदेवाड, महीला होमगार्ड कोमल मोरे यांनी चिमुकलीस आपले जवळ घेवुन तिला पाणी व बिस्कीट देवुन तिचे नातेवाईक संबंधाने विचारपुस केली. त्या चिमुकलीला काही एक व्यवस्थीत बोलता येत नव्हते. त्यावरुन सदरची घटना सपोनि निलपत्रेवार याना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर मुलीस यात्रेत नेमण्यात आलेले पोलीस मदतकेंद्र येथे घेवुन गेले.

तेथील ASI/ मस्के, LHC/1911 पल्लवी डोळे व होमगार्ड दिपक लोखंडे व महीला होमगार्ड कोमल मोरे यांनी यात्रेतील मदतकेंद्र येथिल लाउडस्पीकर वरुन सदर लहान चिमुकली बाबत माहीती दिली. तसेच बाजारात साध्या वेशातील अंमलदार यांना सदर चिमुकली चे नातेवाईकांचा शोध घेण्यास सांगीतले. सोशल मिडीयावर चिमुमलीचे फोटो पाठविले शोधमोहीमे दरम्याण यात्रेत साध्या वेशात गस्ती वर असलेले अंमलदार यांना गस्ती दरम्याण एक महीला घाबरलेल्या स्थितीत दिसुन आली. तिस विचारपुस करता तिने तिचे नाव सुनिता राउत सांगीतले व म्हणाली की तिची दोन वर्षाची मुलगी नामे संध्या हरवली आहे. त्यावरुन सदर अंमलदार यांनी त्या महीलेस पोलीस मदतकेंद्र येथे घेवुन आले व आई मुलीची भेट घडवुन आणली.

पोलीस स्टेशन उस्माननगर येथिल सपोनि. संजय निलपत्रेवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन उस्माननगर येथिल पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी यात्रेत हरवलेल्या 02 वर्षाचे चिमुकलीची व तिच्या आईची भेट घडवुन माणुसकीचे दर्शन घडवुन चांगली कामगीरी करुन नांदेड जिल्हा पोलीस दलाचे नावलौकीक वाढविले असल्याने अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांच्यासह अनेकांनी उस्माननगर पोलीसांचे कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments