Tuesday, June 30

Shiv Sena : शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले; लेखी आश्वासने घेतले माघार

देगलूर, गंगाधर पाठवले| येथील जिल्हा परिषद बाधकाम विभागात काम करण्यासाठी १९ अधिकार याची नियुक्ती असताना केवळ दोन तीन कर्मचाऱ्यावर कार्यालय चालत होते. उध्वव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने कर्मचारी उपस्थित राहात नसल्याने बाधकाम विभागाला लेखी निवेदन देऊन ठाळे ठोकण्यात आले. कार्यकारी अभियंता विजय कांबळे यांनी सर्व कर्मचारी उपस्थित राहतील असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

देगलूर बाधकाम विभागाचे कर्मचारी उंटावर बसून शेळया हाकल्यासारखे नांदेडच्या कार्यालयात बसून नोकरी करतात. सर्वाचे उपस्थिती पट देखील नांदेडलाच हलविण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद बाधकाम विभाग देगलूर अंतर्गत येणाऱ्या देगलूर, बिलोली, मुखेड, धर्माबाद, नायगाव या पाच तालुक्यातील जनतेची हेळसांड होत आहे. जनतेच्या प्रश्नाची दखल घेऊन बाधकाम विभागातील कार्यालयाचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी शिवसेना उध्वव ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक २४ जुलै रोजी बाधकाम विभागाला ठाळे ठोकण्याचा ईशारा देण्यात आला होता.

IMG 20250724 WA0096 Shiv Sena : शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले; लेखी आश्वासने घेतले माघार

त्यानंतर सुधारणा झाली नसल्याने बाधकाम विभागाला ठाळे ठोकले असता लेखी आश्वासने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी महेश पाटील, बालाजी इंगळे, उमेश पाटील, पांडुरंग पाटील, नागनाथ वाडेकर, संजय जोशी, रवि उल्लेवार, भागवत पाटील, मष्णाजी पैलवार, राजेंद्र इगळे उपस्थित होते. आदोलकाकडून कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये,यासाठी पोलीस निरीक्षक मारोती मुढे उपनिरीक्षक नरहरी फड इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!