HomeनांदेडWomen from Kolha : कोल्हा येथील महिलांनी घेतली सीटूच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहुल...

Women from Kolha : कोल्हा येथील महिलांनी घेतली सीटूच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट

नांदेड| असंघटित कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना दि.२१जुलै रोजी निवेदन देण्यात आले.

यावेळी सीटूच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
मोजे कोल्हा पोस्ट मेंडका ता.मुदखेड येथे रोजगार हमी योजनेचे कामे मिळावेत व जॉब कार्ड मिळावेत यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे अनेक वेळा तेथील नागरिकांनी मागणी केली आहे. परंतु त्यांना अद्याप जॉब कार्ड आणि रोह्याचे काम मिळाले नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकारी कर्डीले यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना दिले असून मौजे कोल्हा तालुका मुदखेड येथील कामगारांना जॉब कार्ड आणि काम उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे निवेदन व्हाट्सअप द्वारे पाठविले आहे.

आठ दिवसांमध्ये काम उपलब्ध झाले नाही तर २ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालया समोर निदर्शने करण्याचा इशारा सीटू संघटनेने दिला आहे. या शिष्टमंडळामध्ये सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ. मंगेश वट्टेवाड, सुनीता राहेरे,कविता गायकवाड, अनिता यादव,नंदाबाई मगरे,उज्वला यादव,कविता सूर्यवंशी,सुनीता वाघमारे,प्रियंका सावंत आदींचा समावेश होता.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments