Wednesday, May 13

Jain Old Age Home ; जैन वृद्धाश्रम येथे मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन

नांदेड l स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड आणि रुरल डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन वृद्धाश्रम, जैन मंदिर परिसर, तरोडा खुर्द, नांदेड येथे सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9:45 वा. मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच, नांदेड आणि रुरल डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन वृद्धाश्रम, जैन मंदिर परिसर, तरोडा खुर्द, नांदेड येथे सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9:45 वा. मोफत दंतचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांच्या शुभहस्ते होणार आहे.

तर या शिबिराचे अध्यक्षस्थानी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, ( अध्यक्ष, जैन वृद्धाश्रम ) हे राहणार आहेत.यावेळी डॉ. महेश कुमार डोईफोडे,( आयुक्त, महानगरपालिका), डॉ. भद्रा राव,( प्राचार्य, डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, नांदेड), डॉ. राजेश दार्सी, (विभागप्रमुख, दंतचिकित्सा विभाग), श्रीमती भागरथबाई मुंडकर ( संचालक से. स. सोसायटी बिलोली) सुरेखा पाटणी,( संध्या छाया,वृद्धाश्रम) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

यावेळी मोफत दंत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून दंत उपचार व सल्ला,दंत आरोग्य विषयक मार्गदर्शन होणार आहे.या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे सर्व बसवंतराव मुंडेकर विचार मंचाचे डॉ. शिवदास हंमद आणि एडवोकेट धोंडिबाराव पवार यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!