Ashish Bhore : हिमायतनगरचे आशिष भोरे यांची जर्मन ऑटोमोबाईल कंपनीकडून विदेश दौऱ्यांसाठी निवड

हिमायतनगर| जर्मनीच्या अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी करणाऱ्या हिमायतनगर येथील आशिष संजय भोरे या नवतरुण युवकांस जर्मनीच्या वुर्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून विदेश वारीसाठी पाठविण्यात आले आहे. भोरे कुटुंबातील पहिलाच तरुण विदेशवारी करणार असल्यामुळे आशिष चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जर्मन वुर्थ ऑटोमोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जाळे सध्या महाराष्ट्रतील नांदेड, परभणी सह हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या कंपनीमध्ये हिमायतनगरचे भूमिपुत्र आशिष संजय भोरे हे मागील दोन वर्षापासून एरिया मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. त्यांच्या कामाची उत्कृष्ट दखल म्हणून कंपनी कडून त्यांना यावर्षीच्या विदेश वारीसाठी निवड करण्यात आली आहे. दिनांक 17 जुलै ते 24 जुलै या दरम्यान विदेशातील कजाकिस्तानच्या दौऱ्यासाठी आशिषची निवड झाली आली.

सीनियर मॅनेजर योगेश सोनवले, रीजनल मॅनेजर धीरज दली यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्याची एरिया मॅनेजर आशिष भोरे यांनी मार्केटिंग क्षेत्रात कंपनीला भरघोस उत्पन्न मिळून दिले. येणाऱ्या काळात अशीच प्रगती व्हावी. मार्केटिंग क्षेत्राचा अनुभव मिळावा म्हणून विदेश वारीसाठी पंधरा दिवसाचे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या विदेश वारीमुळे भोरे कुटुंबातील हा पहिलाच तरुण विदेशात जात असल्यामुळे वडील संजय भोरे, आत्या ज्योती कंठे, आई संगीता भोरे, काका पत्रकार अनिल भोरे तथा सर्व पत्रकार बांधव, शिक्षक, बालमित्र व त्यांच्या नातलगांनी त्यांचे अभिनंदन करून विदेशवारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button