Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 16(लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

प्रवासाचा शेवट … पण आठवणींची सुरुवात!
रात्री साडेअकरा वाजता मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस गाठली. तिकिटं दोन महिने आधीच काढलेली होती, त्यामुळे मनावर कोणतंच टेन्शन नव्हतं. बर्थवर अंग टाकताच शरीर शांत झालं आणि मनही निवांत झोपेत गेलं. ( From Amarnath Cave – Part 16 (Author: Dharmabhushan Adv. Dilip Thakur))

सकाळी साडेसातला भोपाळ स्टेशनवर माझे स्नेही, उद्योगपती प्रदीप शुक्ला यांनी भव्य असा नाश्ता आणून दिला, एवढा चविष्ट की थेट एखाद्या फाइव्ह स्टार अमेरिकन ब्रेकफास्टची आठवण झाली. २४ वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात झालेली ओळख आजही अशीच घट्ट टिकून आहे! दरवर्षी ते स्वतः न चुकता स्टेशनवर हजेरी लावतात, नाश्त्याची व्यवस्था करतात. भेटीवेळी त्यांच्या हातून सत्कार स्वीकारला आणि त्यांच्या प्रेमाचा आशीर्वाद घेतला.

शेवटचे क्षण, पण स्वादिष्ट आठवणी
भुसावळ येथे बापू महाजन, ऍड. निर्मल दायमा, सरदार सुरजीतसिंघ बाबूजी व भाजप पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रियन जेवणाची खास सोय केली होती. ते संपेपर्यंत जळगाव आले आणि सुरेश शर्मांचे जिजाजी सर्वांसाठी खास मसाला पान देऊन गेले.मनमाडला शिवसेना नेते अल्ताफ खान यांनी गरमागरम वडापाव दिले.छत्रपती संभाजीनगर स्टेशनवर माझे मित्र कृष्णा कदम, जे स्वतः हेलिकॉप्टर सेवा चालवतात, त्यांनी थेट मोठ्या पार्सलमध्ये गरम पोळी, मटकी, पुलाव, रस्सा, ठेसा, बिसलेरी आणि प्रसिद्ध तारा पान महलचे मसाला पान अशी अफाट मेजवानी दिली.त्यांनी प्रेमाने दिलेला भव्य पुष्पगुच्छ आणि सत्कार विसरणे शक्य नाही.यात्रेतील शेवटचा दिवस जणू वऱ्हाडीची जशी सरबराशी होते तशीच बडदास्त ठेवल्याचे अनेकांनी सांगितले.

शेवटचे चार तास, आठवणींचा कोलाज
छ. संभाजीनगर ते नांदेड या शेवटच्या टप्प्यात प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ शेअर करत होता. चौदा दिवसांची अमूल्य शिदोरी उजळवली जात होती.यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या सेवकांचा, अन्नदात्यांचा आणि नियोजनकर्त्यांचा मी सन्मान केला.स्मृतीचिन्ह देऊन त्यांच्या कार्याची पावती दिली.

अन्नदात्यांचे अमूल्य ऋण
“ना नफा, ना तोटा” या तत्वावर अमरनाथ यात्रा राबवली जाते. एकाही यात्रेकरूने जेवणासाठी पैसा दिला नाही, याचे कारण, सर्व अन्नदाते आणि सेवाभावी व्यक्तींची उदात्त भावना. जेवण पुरवणारे नावाजलेले अन्नदाते,माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण,खा. डॉ. अजित गोपछडे ,नवनाथ सोनवणे, नागेश शेट्टी, हृदयनाथ सोनवणे, रेखा भताने, सतीश सुगनचंदजी शर्मा,सुभाष बंग,श्याम हुरणे, ज्ञानोबा जोगदंड जम्मू, सरदार जसबीरसिंघ जागीरसिंह अमृतसर, हास्य कवी प्रताप फौंजदार, डॉ. प्रिया त्रिमुखे बेंगलोर ,मनोज शर्मा नागपूर,अमोल गोळे अकोला, सरदार कुलदीपसिंघ लुधियाना , भुसावळचे ऍड.निर्मल दायमा व बापू महाजन व संभाजीनगरच्या कृष्णा कदम यांचा समावेश आहे.

एका वेळेसच्या अल्पोहाराची सेवा देणारे डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा , कार्यकारी अभियंता द्वारकादास अग्रवाल, स्नेहलता जायस्वाल, प्रदीप शुक्ला भोपाळ, चंद्रकांत अप्पाराव कदम,अल्ताफ खान मनमाड यांच्या सह आमच्या सोबत चे यात्रेकरू पद्माकर केंद्रे,विजया दत्ता खानजोडे,सारिका रविंद्र केंद्रे, आशिष शिवणीकर, अजय संगेवार, कल्पना, संजय कलकोटे, सुभाष देवकत्ते (आईस्क्रीम ),सुरेश शर्मा (मसाला पान ), अनिरुद्ध रामेश्वर वाघमारे(बिसलरी ),सुनील व्यवहारे (ढोल ताशा )यांना धन्यवाद दिले.अन्नदानातून वाचलेले ₹6200 हे 3 ऑगस्टच्या महाप्रसादासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.लेख संपादन करणारे ज्येष्ठ पत्रकार व मार्गदर्शक विश्वास गुंडावार यांचे खास आभार.

नांदेडमध्ये जल्लोष! विजयाचा, भावनेचा, भक्तीचा!
रात्री ११.३० वा. नांदेड स्थानकावर पुष्पवृष्टी आणि मंगल स्वागत!वयाने मोठे-छोटे सर्वजण पाया पडण्याचा प्रयत्न करीत होते, पण मी नम्रतेने त्यांना सांगितले, “ ही यात्रा मी नाही केली… तुम्ही सगळे चांगले होता, म्हणून ती चांगली झाली.विजय कॅप्टनचा असतो, पण यश संघाचं असतं.”सरते शेवटी‘ किती सांगू मी सांगू कोणाला… आज आंनदी आनंद झाला ’ या गाण्यावर सर्वांनी नाचून यात्रेच्या यशाचं उत्सव साजरा केला.

शब्दांचे शेवटचे, पण मनाचे नाही
“सितारों को आँखों में महफूज रखना,
बड़ी देर तक रात ही रात होगी,
मुसाफिर हैं हम, मुसाफिर हो तुम भी,
किसी मोड़ पर फिर मुलाक़ात होगी।”

या ओळींतून निरोप दिला… पण मनात मात्र अमरनाथची शिवशक्ती कायम जिवंत राहिली. पुढील 17 वा भाग – यात्रेकरूंचे अनुभव.18 व 19 व्या शेवटच्या दोन भागांत, वाचकांच्या प्रतिक्रिया छापणार असल्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर पाठवा –९४२१८ ३९३३३ (क्रमशः)

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button