नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी भोकर व मुदखेड येथे रेल्वे पादचारी पुलाची (एफओबी) मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र दिले आहे.


भोकर शहरात रेल्वे उड्डाण पुल व मुदखेड शहरात रेल्वे भुयारी मार्ग झाल्याने रेल्वे विभागाने त्या ठिकाणी असलेले बंद केले आहेत. सदर रेल्वे उड्डाण पुल आणि भुयारी मार्गामुळे दोन्ही शहरांचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पायी जाणाऱ्या नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे.


या पार्श्वभूमिवर भोकर व मुदखेड येथे अनुक्रमे उड्डाण पुल आणि भुयारी मार्गानजिक तसेच दोन्ही शहरातील रेल्वे यार्ड परिसरात रेल्वे पादचारी पुलाचे बांधकाम करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमिवर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी भोकर व मुदखेड शहरातील रेल्वे पादचारी पुलाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.




