08 special trains Round : काचीगुडा – नगरसोल – काचीगुडा दरम्यान विशेष गाडीच्या 08 फेऱ्या चालवणा

नांदेड| प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वेने काचीगुडा – नगरसोल – काचीगुडा दरम्यान खालील प्रमाणे विशेष गाडीच्या आठ फेऱ्या चालवणार असल्याची माहिती दिली आहे.


गाडी क्रमांक 07055 काचीगुडा – नगरसोल स्पेशल दिनांक 07.08.25, 14.08.25, 21.08.25, 28.08.25 रोजी काचीगुडा येथून दर गुरुवारी दुपारी 15.45 सुटेल आणि सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपली, शंकरपल्ली, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, जालना, औरंगाबाद, रोटेगाव मार्गे नगरसोल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.45 (शुक्र) पोहोचेल.

गाडी क्रमांक 07056 नगरसोल – काचीगुडा स्पेशल गाडी दिनांक 08.08.25, 15.08.25, 22.08.25, 29.08.25 रोजी नगरसोल येथून शुक्रवारी 17.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. या विशेष गाड्यांमध्ये 1AC, 2AC, 3AC, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. दोन्ही गाडीचे वेळापत्रक सोबत






