नवीन नांदेड| एका अपघातात दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार या सिडको येथील तरुणांने जिद्दीने नुकतीच एमपीएससीच्या परिक्षेत यशस्वी होत महसूल सहाय्यक पदी निवड होण्याचा मान मिळविला आहे. दरम्यान या यशाबद्दल सिडको येथील निवासस्थानी येऊन खा. रवींद्र चव्हाण यांनी बुधवार (ता.१६) रोजी अभिनंदन केले.


यावेळी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, काँग्रेस जिल्हाप्रवक्ते बापुसाहेब पाटील, माजी नगरसेविका डॉ.करुणा जमदाडे, वाघाळा शहर ब्लाॅक काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश शिंदे, डॉ.अशोक कलंत्री, देविदास कदम, शेख लतिफ, ज्योती कदम, नरोद्दीन शेख, सुमित कदम, यांच्यासह इतर काँग्रेस पदाधिकारी वशिवसेनचे पदाधिकारी गौरव दरबस्तवार,नागरीक, महिला ,युवक यांच्या सह पत्रकार उपस्थित होते.




