HomeनांदेडHistorical justice : मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक न्याय

Historical justice : मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक न्याय

नांदेड| मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हदगाव येथील सभेत ठामपणे आवाज उठवला.

याच वेळी झालेल्या आंदोलनात “सभा उधळली” असा आरोप लावत आमच्यावर खटले दाखल करण्यात आले. २०१६ ते २०२५ या ९ वर्षांच्या संघर्षानंतर, आज हदगाव न्यायालयाने माननीय न्यायाधीशांच्या निर्णयानुसार निर्दोष मुक्तता दिली. हा निर्णय केवळ आमच्यासाठी नव्हे, तर संपूर्ण मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी मिळालेला ऐतिहासिक विजय आहे.

अ‍ॅड. दिगंबर देशमुख सर यांचे, ज्यांनी हा संपूर्ण खटला विनामूल्य लढत, शेवटपर्यंत साथ दिली आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. या आंदोलनात माधवराव पाटील देवसरकर, गणेश पाटील शिंदे, बालाजी पाटील जाधव, बालाजी पाटील शिंदे, शिवाजी पाटील जाधव, राहुल पाटील धुमाळ, विक्रांत पाटील नळगे आणि २०१६ मध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी झाले होते. अखेर मराठा आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक न्याय मिळाला अशी भावना व्यक्त करत माधवराव देवसरकर यांनी विशेष आभार मानले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व समाजबांधवांचे देखील आभार मानण्यात आले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments