Nadva bridge : चार वेळा मंजूर होऊन हिमायतनगर शहरा जवळील नडव्याच्या पुलाच्या कामाला मुहूर्त मिळेना
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातून उमरखेड ढाणकीकडे जाणाऱ्या तसेच वरद विनायक मंदिर, कनकेश्वर महादेव दर्शनाकडे जाताना शहराला लागून असलेल्या नडव्याच्या फुलाचे काम मागील अनेक वर्षापासून मंजूर होऊन जैसे थेच (Despite approval four times, the work on the Nadva bridge near Himayatnagar city has not been started) आहे.

त्यामुळे अल्पसा पाऊस होताच पुलावरून पाणी वाहून जाऊन ये जा करणाऱ्या नागरिक, शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांसह भाविक भक्तांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पुराचे पाणी पुलावरून जात असताना अलीकडे आणि पैलतीरावर नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. आतापर्यंत चार वेळेस या पुलाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. मात्र पूल निर्मितीच्या कामाचे घोडे कुठे आडकले हे कळने अवघड झाले आहे.

त्यामुळे भावीक भक्त व नागरिकांत बांधकाम विभाग वं स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रावण महिना, गणेशोत्सव पूर्वी या पुलाचे काम पूर्ण करून भावीक भक्त व सर्वसामान्य नागरिकांना होणारी अडचण दूर करावी अशी मागणी लक्ष्मण डांगे, धम्मपालवर सावकार, रमेश डांगे, गणेश इंगळे आदींसह शेतकरी, नागरिक, भाविक भक्त महिला पुरुषातून केली जात आहे.

अख्ख…आयुष्य गेलं, पण नडवाच्या पुलाचं बांधकाम झालं नाही – सच्चिदानंद पवार गुरु स्वामी
अख्ख आयुष्य गेलं, पण नडवाच्या पुलाचं बांधकाम झालं नाही. अनेक वेळा लोकांनी मागणी केली, तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केलं. अखेर तेच झालं — त्या अपूर्ण पुलामुळे कित्येक निरपराध लोकांचे जीव गेले. ही परिस्थिती दु:खद आणि संतापजनक आहे. पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण न झाल्यामुळे लोकांचे प्राण जाणं ही गंभीर प्रशासकीय चूक आहे. यावर जनतेने आवाज उठवणं आवश्यक आहे अशी निराशाजनक प्रतिक्रिया मूळ हिमायतनगरचे रहिवासी सध्या किनवट निवासी सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांनी व्यक्त केली आहे.