Wednesday, May 13

Mahur police Action ; अन् आरोपीची माहूर पोलिसांनी काढली रस्त्यावरून वरात

And the police removed the accused’s body from the road श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। टाइम बाजार नावाचा मटका-जुगार खेळत व खेळवीत असताना ११ लोकांना माहूर पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांची पोलिसांनी रस्त्यावरून वरात काढली.या प्रकरणी माहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईदरम्यान २६ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माहूर शहरातील वार्ड क्रमांक दोन मध्ये एका घरात मटका जुगार खेळत व खेळवीत असल्याची गोपनीय माहिती माहूर चे पोलिस निरीक्षक गणेश कराड यांना मिळाली.त्या वरून आज दिनांक १ रोजी दुपारी माहूर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून गोविंद महादू पवार रा. पार्वेकर नगर माहुर,जयानंद तानाजी कांबळे रा.माहूर,श्रीकांत विजय पोटेकर रा.माहूर,परमेश्वर माधव पतंगे रा.माहूर,गजानन गणपत रणबावळे रा.माहूर, समशेर बेग रा. पडसा,दिलीप खंडु पवार रा.माहूर,आत्माराम दासु राठोड रा.मांडवा,वसंत गुलाब राठोड रा.मांडवा,बाबाराव नागोराव छापेकर लिंबायत,राजु फुलसिंग जाधव लखमापूर, यांना टाइम बाजार नावाचा मटका जुगार लोकांकडून पैसे घेवुन बेकायदेशीर व विनापरवाना खेळत व खेळवित असतांना नगदी रुपये मटका जुगाराचे साहित्य मोबाईल सह पकडून २६ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

आबासाहेब पारवेकर नगर येथून पोलिस ठाण्या पर्यंत पाई नेत वरात काढली.पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानोबा पंढरीनाथ खंदाडे वय 38 वर्षे यांच्या फिर्यादी वरुण ११ लोकां विरुद्ध गुरनं १०७/२०२५ कलम १२ (अ)म.जु.का. प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शना खाली जमादार चौधरी हे करीत आहे.या कार्यवाही ने अवैध धंदे करणाऱ्या मध्ये धडकी भरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!