Homeनांदेडनांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी...

नांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार -NNL

नांदेड| जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर , जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे, डॉ.विद्या झिणे मॅडम, डॉ. हनुमंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 D ECHO तपासणी दि.10/06/2024 रोजी करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील बालकांची तपासणी बालाजी रुग्णालय, मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण आणि रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले. यात नांदेड जिल्ह्यातील एकूण 105 बालकांची तपासणी करण्यात आली असून या पैकी 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण ग्रा.रू.भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय भोकर येथील 4 बालके नांदेड येथे झालेल्या 2 D -Echo Camp साठी पाठवण्यात आले होते त्यापैकी 2 बालके ही शस्त्रक्रिये पात्र ठरली असून 1 बालक हे फॉलोअप साठी सांगितले आहे आणि 1 बालक नॉर्मल आहे असे सांगण्यात आलेले आहे.

IMG 20240611 WA0009 नांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार -NNL

या कामी श्री अनिल कांबळे RBSK जिल्हा कार्यक्रम समन्वयक व श्री विठ्ठल तावडे DEIC व्यवस्थापक,डॉ.व्यंकटेश टाकळकर, डॉ.अविनाश गुंडाळे, डॉ.ज्योती येन्नावार,डॉ.अपर्णा जोशी ,गिरी रावलोड ,संदीप ठाकूर,स्वाती सुवर्णकार आणि वत्सला धुमाळे व ग्रा.रू.भोकर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. राज्यात शालेय आरोग्य तपासणी हा कार्यक्रम यशस्वी ठरल्यामुळे व कुपोषणाचा प्रश्न गंभीर असल्यामुळे बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

नांदेड जिल्ह्यातील ४५ आरोग्य पथकांद्वारे वर्षातून ०२ वेळा अंगणवाडीतील व ०१ वेळा शाळेतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ० ते १८ या वयोगटातील बालाकंची 4D म्हणजे जन्मतः व्यंग (Defect), पोषणमुल्यांची कमतरता (Deficiencies), शाररीक व मानसिक विकासात्मक विलंब (Developmental Delay), आजार (Diseases) यांचे निदान व उपचार करण्यात येतात. हृदयरोग तपासणी (2D ECHO) ,नेत्र रोग, आकडी/ फेफरे यांची मोठ्याप्रमावर शिबिरे आयोजीत करून निदान व औषधोपचार करण्यात येते.

IMG 20240611 WA0011 नांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार -NNL

जिल्ह्यातील अनेक मुला-मुलीना या कार्यक्रमाचा मोफत लाभ झालेला असून त्यात अनेक जणांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यातील अंगणवाडी तपासणी दरम्यान कुपोषित बालकांना निदान व औषधोपचार करून श्रेणीवर्धन करण्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) स्त्री रुग्णालय श्यामनगर, नांदेड संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या पालकास बुडीत मजुरीचा लाभ देण्यात येतो. तसेच जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (District early Intervention Center / DEIC) अंतर्गत ० ते ०६ वर्ष वयोगटातील ज्या बालकांना जन्म जात आजार, अवयवांच्या उणीवा आणि विकास/वाढीचा अभाव आढळलयास त्यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया/औषधोपचार करून भविष्यात त्यांना शरीराच्या गुंतागुंतीच्या आजार किंवा उणीवापासून दूर ठेवणे शक्य होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments