नांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार -NNL
नांदेड| जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर , जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे, डॉ.विद्या झिणे मॅडम, डॉ. हनुमंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 D ECHO तपासणी दि.10/06/2024 रोजी करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील बालकांची तपासणी बालाजी रुग्णालय, मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण आणि रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले. यात नांदेड जिल्ह्यातील एकूण 105 बालकांची तपासणी करण्यात आली असून या पैकी 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्...
