Wednesday, May 13

senior citizens : येत्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यासाठी खासदार आमदार घेणार पुढाकार – डाॅ.हंसराज वैद्य

नांदेड| गेल्या आठवडाभरात नांदेड-हिंगोलीच्या लोक प्रतिनिधींच्या भेटीत ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नांदेडचे तरूण तडफदार खा.रविंद्र चव्हाण साहेब तथा सर्व आ.बाबूराव कदम, बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, श्रीजया चव्हाण, संतोष बांगर आणि मुर्कुटे आदी सुसंस्कारित मान्यवरांनीं सकारात्मक व समाधान कारक प्रतिसाद दिला आहे.

खा.रविंद्रजी चव्हाण देशाचे खरे आधारस्तंभ,शिल्पकार तथा राष्ट्रीय संपत्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अत्यंत, लक्ष पूर्वक दक्षतेने,गांभिर्याने तथा जिव्हाळ्याने ऐकून घेऊन मी प्रश्न एकून घेऊन चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या कथा,व्यथा, दुःख तथा हाल आपेष्टां एकून क्षणभर गंभीर झाले. आणि म्हणाले कि, डाॅ. वैद्यसाहेब मी ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळऊन देण्यासाठी हा प्रश्न लोकसभेत तारांकित करून सविस्तर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. माझा तारांकितसाठी नंबर लागला नाही तर मी तो शून्य तासात अथवा लक्षवेधित प्रश्न मांडून ज्येष्ठ नागरिकांनां न्याय मिळे पर्यंत मी थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

WhatsApp Image 2025 06 25 at 7.52.12 PM senior citizens : येत्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यासाठी खासदार आमदार घेणार पुढाकार - डाॅ.हंसराज वैद्य

आ.बाबुराव कदम कोहळीकर, बोंढारकर, कल्याणकर, बांगर व मुर्कूटे च्या भेटीतही अगदी तसाच अनुभव आला. आ. विधिज्ञ श्रीजयाताई चव्हाण त्यांच्या मतदार संघात पूर्वनियोजित कार्यक्रमास गेलेल्या असल्याने दोन प्रयत्नात त्यांची प्रत्यक्ष सरळ भेट होऊ शकली नाही. पण त्यांचे पिताश्री माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांचे निवेदन स्वताः स्विकारून सचिवांना आज्ञा केली की, हा ज्येष्ठांचा प्रश्न श्रीजया ताईना विधान सभेत मांडायला सांगा असे सांगून मला, प्रभाकर कुंटूरकर, गिरिष बार्‍हाळे, डाॅ.लक्ष्मीताई पुरणशेट्टीवार अदिंना सुखद धक्का दिला अशी माहिती डॉ.हंसराज वैद्य यांनी दिली.

WhatsApp Image 2025 06 25 at 7.52.11 PM senior citizens : येत्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यासाठी खासदार आमदार घेणार पुढाकार - डाॅ.हंसराज वैद्य

एवढेच नाही तर उस्मानाबाद,लातूर व सोलापूर जिल्ह्यातील कांही आमदार विधानसभेत लाऊन धरतील अशी आशा आहे. या आधी राज्य सभेचे खा.स्वतः अशोकराव चव्हाण व खा.डाॅ.अजित गोपछडे यांनी राज्य सभेत निवेदन देऊन चर्चा घडऊन आणण्याचे व प्रश्न लाऊन धरण्याचे तत्वतः मान्य केलेलेच आहे. म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न नक्की सुटणार असे गृहित धरण्यास काहिच हारकत नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!