HomeनांदेडReservation for Sarpanch : लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १ जुलै...

Reservation for Sarpanch : लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १ जुलै रोजी आरक्षण सोडत

लोहा| लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत १ जुलै रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयात होणार आहे. तेव्हा या आरक्षण सोडत होताना तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच आरक्षण सोडत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.

लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे २०२५-३०या पाच वर्षांसाठी मुंबई ग्रामपंचायत (सरपंच- उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ चे कलम ५ मधील तरतुदी नुसार आरक्षण निश्चित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आदेशीत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २७टक्के ओबीसी आरक्षणामुळे नव्याने सोडत काढली जाणार आहे.

paralikat tahsildar Reservation for Sarpanch : लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १ जुलै रोजी आरक्षण सोडत

तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जाती (एससी) साठी २० ग्रामपंचायत त्यात १० महिलांसाठी राखीव असतील. अनुसूचित जमाती (एसटी ) साठी दोन त्यात एक ग्रामपंचायत महिला साठी आरक्षित असेल.नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी ३२ ग्रामपंचायत असून, त्यात १६ ग्रामपंचायत या ओबीसी महिला सरपंच पदासाठी राहणार आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ६४ ग्रामपंचायत असून, त्यात ३२ महिलांसाठी राखीव असतील असे आरक्षण आहे.

१जुलै रोजी दुपारी तीन वाजता तहसीलदार विठ्ठल परळीकर याच्या उपस्थितीत सरपंच पदाचे गावनिहाय आरक्षण सोडत काढले जाणार आहे.हे २०२५ते २०३०या पाच वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायत साठी लागून राहणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सरपंच उपसरपंच सद्स्य, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार विठ्ठल परळीकर, निवडणूक नायब तहसीलदार संदीप हाडगे, सहायक महसूल अधिकारी राजेश गायंगी, ईश्वर धुळगुंडे, सूर्यकांत पांचाळ यांनी केले आहे

मागील २०२०मध्ये तहसीलदार परळीकर यांनी अतिशय अचूक ,निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत सोडत काढली होती .आरक्षण सोडत २५ एप्रिल रोजी झाली होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणा नुसार ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा काढले जाणार आहे .ओबीसी सरपंच पदाची एक जागा वाढली आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments