Paus Dindi organized : माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी रविवारी पाऊस दिंडीचे आयोजन – धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर

नांदेड| मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे बळीराजा त्रस्त असून माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी रविवार दि.29 जुन रोजी सकाळी ६ वाजता भाजप,अमरनाथ यात्री संघ, लायन्स तर्फे 25 व्या रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जर पाऊस पडत असेल तरी देखील रत्नेश्‍वरी गडावर अमरनाथ यात्रेकरू हजारो बिया, कोयी तसेच सिडबॉल पेरणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

बालाजी मंदिर हनुमान टेकडी नांदेड येथून सुरू होणार्‍या या पाऊस दिंडीचे यंदाचे पंचविसावे वर्षे आहे. पंचविसावी अमरनाथ यात्रा 4 जुलै ला व सविसावी अमरनाथ यात्रा 11 जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून रवाना होणार आहे. अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने ३ महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात. यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाचपणी या पाऊस दिंडी मध्ये करण्यात येते.संपूर्ण भारतात अशा प्रकारे अमरनाथ यात्रेकरूंची पूर्वतयारी फक्त नांदेड मध्येच घेण्यात येते.

रस्त्यामध्ये जागोजागी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, पवन गुरुखुदे,कैलास महाराज वैष्णव, गणेश झोळगे, सचिन माधवराव झरीकर, विश्वेश्वर महादेव मंदिर नवीन सिडको यांच्या तर्फे चहा-फराळाची व्यवस्था करण्यात येणार आहे . रत्नेश्‍वरी देवस्थान व अन्नपुर्णा माता देवस्थान तर्फे अमरनाथ यात्रेकरूंचा सत्कार करण्यात येणार आहे.या दोन्ही मातांना पावसासाठी साकडे घालण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वजण वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेणार आहेत. अन्नपूर्णा मातेच्या सभागृहात अमरनाथ यात्रेकरूंचे गेट टुगेदर होणार आहे.

महाआरती नंतर दरवर्षी प्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे गडावर वेगवेगळ्या बिया तसेच सिडबॉल पेरण्यात येणार आहे.पाऊस दिंडी मध्ये यात्रेकरू सोबत सहभागी होऊ इच्छिणार्‍या नागरिकांनी आपल्या घरी जमा असलेल्या बिया, कोयी सोबत घेऊन यावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button