नवीन नांदेड l दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पुजा हेल्थकेअर सेंटर सिडको नांदेडचे संचालक डॉ.अवधूत पवार आणि त्यांचे चिरंजीव सुजोक व निसर्गोपचार तज्ञ डॉ.संभाजी पवार आणि त्यांचे सहकारी मित्राद्वारे आळंदी ते पंढरपूर पाई चालणाऱ्या भाविकांच्या गुडघे दुःखी, कंबर दुःखी आणि इतर होणाऱ्या त्रासावर अकुप्रेसर, सुजोक, कायरो, मसाज या पद्धतीने सासवड पुणे येथे जवळपास 5000 भाविकांवर मोफत उपचार करण्यात आले .


आळंदी ते पंढरपूर पाईवारी करणारे वृद्ध,भाविक चालतात तेव्हा त्यांना गुडघे कंबर मान पाठ दुःखीचा त्रास होतो शिवाय हडपसर ते सासवड या मध्ये दिवे घाट सर्वात मोठा जवळपास ३२ किलोमीटर चा सर्वात मोठा टप्पा असतो, हा टप्पा पूर्ण करून आलेल्या भाविकांवर हे मोफत उपचार करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी आणि आपले कर्तव्य समजून दर वर्षी डॉ. अवधूत पवार आणि त्यांचे चिरंजीव डॉ.संभाजी पवार आणि बाळासाहेब पवार त्यांच्या टीम सह गेल्या पाच वर्षांपासून मोफत उपचार सेवा करत आहेत. या वर्षी सुध्दा डॉ.अवधूत पवार आणि डॉ.संभाजी पवार स. नरेंद्र सिंघ ग्रंथी,बाळासाहेब पवार, ऋषिकेश पांचाळ,अलकेश भोशीकर, अशोक जाधव,अरविंद जाधव,उद्धव जाधव,उद्धव काकडे,कुणाल लोखंडे नांदेड च्या मित्र मंडळी सोबत सासवड येथे २२ आणि २३ जून २०२५ रोजी जवळपास 5000 भाविक रुग्णांचा मोफत उपचार करून सेवा करन्यात आली. या वेळी त्यांना केक्स्टोरीचे प्रोप्रायटर संतोष चौखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.



