HomeउमरखेडUmarkheed ; उमरखेड तहसील कार्यालयात ४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य प्रदान...

Umarkheed ; उमरखेड तहसील कार्यालयात ४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य प्रदान…

उमरखेड l उमरखेड तालुक्यातील.. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपयांची अशी एकूण चार कुटुंबांना ४ लाखाची मदत शासनाकडून आमदार किसनराव वानखेडे यांनी मंजुर करून घेतली होती .

या चारही कुटुंबांना आज तहसील कार्यालय उमरखेड येथे प्रत्येकी एक – एक लाखाचे वाटप दिनांक २० जून रोजी आमदार किसनराव वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये श्रीमती सुरेखा विजय चव्हाण ( रा.निंगणूर )श्रीमती सिंधुताई विलास राठोड ( रा.चुरमुरा )श्रीमती मीराबाई लक्ष्मण राठोड ( रा.बोथा वन ) श्रीमती उषा उत्तम घुमणर ( रा.डोंगरगाव ) या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे .

यावेळी माजी आमदार विजयराव खडसे,माजी जि.प.अध्यक्ष रमेश चव्हाण, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते,कृ.उ.बा.स.सभापती कृष्णा पाटील देवसरकर, विवेकानंद पाटील नलावडे, अंकुश वानखेडे, धनराज पाटील उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments