Friday, May 15

Assistant Police ; सीआरपीएफमध्ये डोंगरगावचे देवानंद सुकापूरेंची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती

हदगाव, शेख चांदपाशा l तालुक्यातील डोंगरगाव या लहानशा गावातून अतिशय मेहनतीने पुढे येत, देवानंद सुकापूरे यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), नागपूर येथे यशस्वी निवड मिळवली. त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये सेवा बजावली असून, त्यांनी आसाम, दिल्ली, नागपूर, जम्मू-काश्मीर, श्रीनगर, छत्तीसगड आणि सध्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे आपली कर्तव्ये पार पाडत आहेत.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध ठिकाणी कार्य करताना त्यांनी उत्कृष्ट शिस्त, निःस्वार्थ सेवा आणि कर्तव्यपरायणता दाखवली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना प्रथम हवालदार (Havaldar) पदावर बढती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या प्रतिष्ठित पदावर पदोन्नती देण्यात आली.

दि. 20 जून 2025 रोजी, सीआरपीएफ कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते देवानंद सुकापूरे यांना पदोन्नतीचे पत्र देण्यात आले. या गौरव प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.

या यशस्वी वाटचालीबद्दल डोंगरगाव गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील सरपंच श्री. दिगंबर निळे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. भगवान निळे, शेतकरी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य श्री. पंडित घुन्नर, माजी सदस्य भीमराव मुलगीर, महाराष्ट्र पोलीस दलातील राजेश घुन्नर व मारोती मुलगीर, मुख्याध्यापक दत्ता तुरनर, शिक्षक अनंता तुरनर, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर गोदगिरे, शेतकरी प्रतिनिधी रमेश मुलगीर, प्रकाश मुलगीर, साईनाथ निळे, प्रदीप मुलगीर, प्रदीप भुसनर, भारत घुन्नर, कैलास वाढवे, यादव सुकापूरे, देवानंद मिसाळ, अत्रीनंदन मुलगीर सर, प्रा. गजानन मिजगार सर, प्रा. गजानन गिरी (संपादक), निरंजन दहेकर, दिनकर शिंदे, बाबाराव कुंभकर्ण, देवबा पाटील, प्रल्हाद माने यांच्यासह अनेक नातेवाईक व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!