Assistant Police ; सीआरपीएफमध्ये डोंगरगावचे देवानंद सुकापूरेंची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती
हदगाव, शेख चांदपाशा l तालुक्यातील डोंगरगाव या लहानशा गावातून अतिशय मेहनतीने पुढे येत, देवानंद सुकापूरे यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), नागपूर येथे यशस्वी निवड मिळवली. त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये सेवा बजावली असून, त्यांनी आसाम, दिल्ली, नागपूर, जम्मू-काश्मीर, श्रीनगर, छत्तीसगड आणि सध्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे आपली कर्तव्ये पार पाडत आहेत.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध ठिकाणी कार्य करताना त्यांनी उत्कृष्ट शिस्त, निःस्वार्थ सेवा आणि कर्तव्यपरायणता दाखवली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना प्रथम हवालदार (Havaldar) पदावर बढती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या प्रतिष्ठित पदावर पदोन्नती देण्यात आली.
दि. 20 जून 2025 रोजी, सीआरपीएफ कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्...
