नांदेडस्पोर्ट्स

Sports Award : नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक, क्रीडा मार्गदर्शक व नांदेड भूषण गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार

नांदेड| क्रीडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करणाऱ्या साठी नांदेड ऑलिंपिक संघटनेच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार २९ जून२०२५रोजी वितरित करण्यात येणार असून जिल्ह्यातील ऑलिंपिक संघटनेला सलग्न असणाऱ्या खेळाच्या खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी व क्रीडा संघटक यांनी आपले प्रस्ताव सादर करण्याचे आव्हान ऑलम्पीक संघटनेचे अध्यक्ष सरदार जसविंदरसिंग रामगडिया व महासचिव डॉ .राहुल वाघमारे यांनी केले आहे.

सदरील पुरस्कार हा जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक व खेळाडू यांच्या कार्याचे योगदानाचे मूल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांचं पाहून इतरांनीही प्रेरणा मिळावी या हेतूने नांदेड भूषण गुणवंत क्रीडा संघटक ,नांदेड भूषण गुणवंत क्रीडा मार्गदर्शक ,महिला/पुरुष व नांदेड भूषण गुणवंत खेळाडू महिला/पुरुष असे पाच पुरस्कार देण्यात येणार असून त्यात रोख रक्कम 11 हजार रुपये सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

संघटक पुरस्कारासाठी मागील पाच वर्षात विविध खेळाच्या स्पर्धा आयोजन ,चर्चासत्रे ,मैदानं बनविने ,खेळाबाबत वर्तमानपत्रात लिखाण,खेळाबाबत रेडिओ ,टीव्हीवर मुलाखात या कार्याचा विचार होणार आहे. तर क्रीडा मार्गदर्शकाने मागील पाच वर्षात वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार केले असतील तर अर्ज करू शकतात. तसेच नांदेड भूषण गुणवंत खेळाडू पुरस्कार साठी मागील पाच वर्षातील वरिष्ठ गटात केलेली राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येईल.

त्यामध्ये सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा ,खेलो इंडिया मान्यता प्राप्त , वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धा ग्राह्य धरण्यात येतील. खेळाडू पुरस्कार करिता भारतीय ऑलिम्पिक खेळात समावेश असणाऱ्या खेळांच्या तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेस संलग्न असणाऱ्या खेळाच्या संघटनेचे संघटक मार्गदर्शक खेळाडूंनी अर्ज करावेत. खेळाडू पुरस्काराकरिता अथलेटिक, आर्चरी ,बास्केटबॉल , सायकलिंग , तलवारबाजी , जिम्नास्टिक , बॉक्सिंग , लॉनटेनिस ,नेमबाजी ,हॉकी ,बॅडमिंटन ,हॉलीबॉल ,कनोईंग कायाकिंग ,क्रिकेट जलतरण, डायव्हिंग , वॉटरपोलो , ट्रायथलॉन ,बॉडी बिल्डिंग ,कुस्ती , स्केटिंग ,बेसबॉल , रोईंग , स्क्वॉश,टेबल टेनिस, तायक्वॉदो ,कबड्डी, खो-खो, वेटलिफ्टीग , मल्लखांब , आट्यापाट्या बुद्धिबळ ,बिलियर्ड्स अँड स्नुकर , याटिंग, इत्यादी खेळांचा समावेश आहे.

इच्छुक क्रीडा संघटक क्रीडा मार्गदर्शक खेळाडू यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दिनांक १९ जून पासून 23 जून पर्यंत ऑलिम्पिक संघटनेचे कार्यालय शांती गार्डन पारस नगर येथे सादर करावेत अर्ज प्राप्त करण्याकरिता ऑलम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर बालाजी जोगदंड (मोबाईल क्र.-7020815826 ) महासचिव डॉ . राहुल वाघमारे 8055380258 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेचे चेअरमन शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपीले ,कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी , डॉ. रमेश नांदेडकर , कोषाध्यक्ष प्रा .जयपाल रेड्डी, विक्रांत खेडकर ,विनोद गोस्वामी , टि . एन रामन बैनवाड ,डॉ. दिनकर हंबर्डे ,डॉ. राजेश जांबळे ,प्रा. वृषाली पाटील जोगदंड , डॉ .कळमसे , बाबुराव खंदारे ,विनोद जमदाडे, कुलदीप सिंग जाट ,बंटी सोनसळे, राष्ट्रपाल नरवाडे यांनी केले आहे .

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button