Wednesday, May 13

Anti-Corruption Bureau : किनवट मध्ये दोन महिला तलाठ्यांना १६ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

किनवट, परमेश्वर पेशवे| तक्रारदार यांचे वडिलोपार्जित 7 एकर शेत आहे. त्यापैकी अर्धी शेती साडे तीन एकर तक्रारदार यांचे पत्नीचे नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यांचे कामासाठी तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे, वय 34 वर्षे, पद तलाठी, सज्जा निचपूर ,ता. किनवट, जिल्हा नांदेड, सुजाता शंकर गवळे वय 25 वर्षे, पद तलाठी, सज्जा कणकवाडी, ता. किनवट, जिल्हा नांदेड यांनी लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 16000/ रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तसेच आरोपींच्या घरची झाडाझडती सुरु केली आहे.

यातील तक्रारदार यांचे वडिलोपार्जित 7 एकर शेत आहे. त्यापैकी अर्धी शेती साडे तीन एकर तक्रारदार यांचे पत्नीचे नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तक्रारदार त्यांचे कामाचे अनुषंगाने तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे, वय 34 वर्षे, पद तलाठी, सज्जा निचपूर ,ता. किनवट, जिल्हा नांदेड यांना भेटले असता, त्यांनी प्रथम चाळीस हजार रुपये व तडजोडी अंती 17000/_ रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दि.29/05/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यांच्या तक्रारीची पडताळणी एसीबीने दिनांक 03/06/2025 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता, यातील तक्रारदार लोकसेविका तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे, वय 34 वर्षे, पद तलाठी, सज्जा निचपूर ,ता. किनवट, जिल्हा नांदेड व तलाठी सुजाता शंकर गवळे वय 25 वर्षे, पद तलाठी, सज्जा कणकवाडी, ता. किनवट, जिल्हा नांदेड यांना भेटले. तलाठी तेलंगे यांनी तक्रारदार यांना तलाठी गवळे यांना भेटा असे सांगून त्यांच्याकडे पाठविले. तेव्हा तलाठी गवळे यांनी तक्रारदार यांची फाईल घेऊन तलाठी तेलंगे यांना दाखवून त्यांना बोलून परत आले व तेलंगे मॅडम ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे करा असे म्हणाल्या.

तक्रारदार यांनी तलाठी तेलंगे यांना कामाचे विचारले असता, तेव्हा तलाठी तेलंगे म्हणाले की त्यादिवशी सांगितले, त्यापेक्षा 3 हजार कमी केले. त्यावेळी तक्रारदार त्यादिवशी सतरा हजार म्हणले होते असे बोलले, तेव्हा तलाठी तेलंगे यांनी तलाठी गवळे यांची समक्ष अठरा हजार रुपये असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी आता अठरा हजार आणू की सोळा हजार असे म्हणाले. तेव्हा तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे, वय 34 वर्षे, पद तलाठी, सज्जा निचपूर ,ता. किनवट, जिल्हा नांदेड यांनी सोळा हजार असे म्हणून स्वतः साठी व तलाठी सुजाता शंकर गवळे वय 25 वर्षे, पद तलाठी, सज्जा कणकवाडी, ता. किनवट, जिल्हा नांदेड यांच्या साठी लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना मिळून आले.

दिनांक 03/06/2025, दिनांक लाच स्वीकृती सापळा कार्यवाही आजमावली असता, तक्रारदार यांच्या कडून लोकसेविका तलाठी तेलंगे आणि गवळी यांनी लाचेची रक्कम 16000/ रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत. आरोपीचे अंग झडतीमध्ये मिळून आलेल्या वस्तू आणि रोख रक्कम – एक Vivo कंपनी चा आणि एक relame कंपनीचा मोबाईल. तेलंगे यांच्या ताब्यातून नगदी 6620 रुपये आणि आलोसे गवळे यांच्या ताब्यातून नगदी 18820 रुपये मिळून आले आहे. या कार्यवाही नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपी यांचे किनवट व नांदेड येथील राहते घराची घरझडती सुरू केली आहे. या छाप्यानंतर तलाठी तेलंगे आणि गवळी यांचेविरुद्ध पो.स्टे. किनवट, ता. किनवट, जि. नांदेड येथे भ्र.प्र. अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

हि कार्यवाही श्री.संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र,नांदेड, डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र,नांदेड, पर्यवेक्षण अधिकारी श्री.प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि.नांदेड, 98701 45915 यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रिती जाधव, सहा. पोलीस उप निरीक्षक शेख रसूल,अरशद अहेमद खान, सयद खदीर व चापोह/गजानन राउत सर्व नेम. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी केली. या कार्यवाहीनानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले कि, कुन्हीही शासकीय कामासाठी लाच मागणी करत असले तर पुढील दूरध्वनी 02462 253512
टोल फ्री 1064 व्हॉट्सअप नंबर 9359056840 तक्रार द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!