Anti-Corruption Bureau : किनवट मध्ये दोन महिला तलाठ्यांना १६ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक
किनवट, परमेश्वर पेशवे| तक्रारदार यांचे वडिलोपार्जित 7 एकर शेत आहे. त्यापैकी अर्धी शेती साडे तीन एकर तक्रारदार यांचे पत्नीचे नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यांचे कामासाठी तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे, वय 34 वर्षे, पद तलाठी, सज्जा निचपूर ,ता. किनवट, जिल्हा नांदेड, सुजाता शंकर गवळे वय 25 वर्षे, पद तलाठी, सज्जा कणकवाडी, ता. किनवट, जिल्हा नांदेड यांनी लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 16000/ रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तसेच आरोपींच्या घरची झाडाझडती सुरु केली आहे.
यातील तक्रारदार यांचे वडिलोपार्जित 7 एकर शेत आहे. त्यापैकी अर्धी शेती साडे तीन एकर तक्रारदार यांचे पत्नीचे नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तक्रारदार त्यांचे कामाचे अनुषंगाने तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे, वय 34 वर्षे, पद तलाठी, सज्जा निचपूर ,ता. किनवट, ज...
