demanding bribes : अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर लाचमागणी गुन्हा

NNL Team
By NNL Team

नांदेड| लोडींग ऑटो वाहनामध्ये जनावरांची अर्धापूर येथून वाहतुक करू देण्यासाठी 50,000 रू लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्धापूर पोलीस उपनिरीक्षकासह एका खाजगी इसमावर लाचमागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यातील तक्रारदार यांचे लोडींग ऑटो वाहनामध्ये जनावरांची अर्धापूर येथून वाहतुक करू देण्यासाठी लोकसेवक पोउपनि अयुब कुरैशी (शेख) हे पन्नास हजार रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दि.23/05/2025 रोजी प्राप्त झाली. त्यावरून दिनांक 24/05/2025 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता, यातील लोकसेवक पोउपनि अयुब कुरैशी (शेख) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा अनुचित आर्थिक फायदा करून घेण्याकरीता तक्रारदार यांचे जनावरे वाहतुकीचे लोडींग ऑटोवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी लाच मिळविण्याचा प्रयत्न केला. लोकसेवक पोउपनि अयुब कुरैशी (शेख) यांच्यासोबत राहणारे खाजगी इसम राजू भिसे पाटील यांनी पोउपनि अयुब कुरैशी(शेख) यांच्यासाठी लाच स्विकारण्यास सहमती दर्शविली.

पोउपनि अयुब कुरैशी (शेख) यांचे एक पोलीस अधिकारी म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 प्रमाणे दखलपात्र अपराध होण्यापासून टाळणे हे त्यांचे कर्तव्य असतांना ते न बजावण्यासाठी त्यांनी खाजगी इसम राजू भिसे पाटील याच्या माध्यतातून लाच मिळविण्याचा प्रयत्न केला. तसेच खाजगी इसम राजू भिसे पाटील याच्याशी संगणमत करून जनावराचे अवैध वाहतुकीस स्वतः ही अटकाव करणार नाही किंवा दुस-यालाही कारवाई करू देणार नाही अशा प्रकारचे षडयंत्र करून जनावरांचे अवैध वाहतूकीचा कट रचला. तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50,000 रू लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली आहे.

दिनांक 26/05/2025, दिनांक 28/05/2025 रोजी लाच स्वीकृती सापळा कार्यवाही आजमावली असता, लोकसेवक पोउपनि अयुब कुरैशी व त्यांचे सोबत राहणारे खाजगी इसम राजू पाटील यांनी ला.प्र.वि कारवाई चा संशय आल्यामुळेच जाणीवपूर्वक लाच रक्कम स्विकारण्याचे टाळले आहे. त्यामुळे लाच स्वीकृती झाली नाही.

आरोपीचे अंग झडतीमध्ये मिळून आलेल्या वस्तू आणि रोख रक्कम आरोपी लोकसेवक फरार असल्याने अद्याप अटक नाही. आरोपी लोकसेवक यांचे नांदेड येथील राहते घराची घरझडती सुरू आहे. आरोपी लोकसेवक अयुब कुरैशी (शेख), पद पोलीस उपनिरीक्षक नेमणूक नेम. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड व खाजगी इसम राजू भिसे पाटील यांचेविरुद्ध पो.स्टे. इतवारा, ता. जि. नांदेड येथे गुन्हा रजि. नं. 180/2025 कलम 7,7A भ्र.प्र.अधिनियम व सहकलम भारतीय न्याय संहिता कलम 61 (2), 62 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेऊन पुढील तपास करण्याची तजवीज ठेवली आहे.

हि कार्यवाही सापळा पथक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रिती जाधव, पोना.बालाजी मेकाले, अरशद अहेमद खान, सयद खदीर व चापोह/गजानन राउत, प्रकाश मामुलवार यांनी संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, डॉ.संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, पर्यवेक्षण अधिकारी प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक ला.प्र.वि.नांदेड, 98701 45915, दूरध्वनी 02462 253512 , टोल फ्री 1064
व्हॉट्सअप नंबर 9359056840यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!