Three people swept away in a stream : हदगाव तालुक्यातील ओढ्यात मायलेकीसह तिघेजण वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले

NNL Team
By NNL Team

हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील मनाठा सर्कल अंतर्गत येणाऱ्या वरवट परिसरात सोमवारी (दि. २७ मे) दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे भीषण घटना घडली. पावसामुळे आलेल्या पूराच्या प्रवाहात एक महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यातील दुर्गा बळवंत शंकरगे (वय ८) हिचा मृतदेह दुपारी सापडला असून, तिची आई अरुणा बळवंत शंकरगे (वय ३७) आणि बहीण समृद्धी विजय शंकरगे (वय १०) यांचा अनेक तासाच्या शोधानंतर सायंकाळी ६ वाजता मृतदेह सापडले.

yAH Three people swept away in a stream : हदगाव तालुक्यातील ओढ्यात मायलेकीसह तिघेजण वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले

मिळालेल्या माहिती नुसार, अरुणा शंकरगे दोन मुलींना घेऊन शेतात गेल्या होत्या परतताना पावसाने अचानक जोर धरला. वरवट गावा जवळ ओढ्यावर असलेल्या पुलावरून त्या घरी परतत असताना जोरदार पुराच्या लाटांमुळे तिघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.या घटनेची माहिती मिळताच हदगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसिलदार मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्यासह बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

yAH 2 Three people swept away in a stream : हदगाव तालुक्यातील ओढ्यात मायलेकीसह तिघेजण वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले

हदगांव नांदेड येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून, वरवट ते चिखली फुटाणा चुचा या ओढ्यामध्ये शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.या दुर्घटनेमुळे संपूर्ण वरवट परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून शोधकार्य वेगाने सुरू असून सायंकाळी ६ वाजता दोघीं चे मृतदेह आढळून आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.

yAH 1 Three people swept away in a stream : हदगाव तालुक्यातील ओढ्यात मायलेकीसह तिघेजण वाहून गेले; तिघांचे मृतदेह सापडले

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!