HomeनांदेडSeed application process begins : बियाण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू 

Seed application process begins : बियाण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू 

नांदेड| खरीप हंगाम सन 2025 मध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थानी पिक प्रात्यक्षिकाच्या लाभासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यांसाठी आजच महाडीबीटीवर अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

खरीप हंगाम सन 2025 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर, मुग व उडिद पिकांसाठी (10 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) व राष्ट्रीय खा‌द्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकासाठी (5 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षीकांसाठी 31 मार्च 2024 च्या पुर्वी नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यासाठी महाडीबीटीवर https://mahadbt.maharashtragov.in/Farmer/AgriLogin अर्ज करण्याची प्रक्रिया 26 ते 29 मे 2025 पर्यंत चालु आहे. 

प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर गटांची निवड करण्यात येणार आहे. सदर पिक प्रात्यक्षिके ही सुधारीत लागवड तंत्रज्ञान आधारीत राबविण्यात येणार असुन त्यामध्ये बियाणे व इतर कृषि निविष्ठा अर्थसहाय्यीत दराने उपलब्ध करण्यात येणार आहेत. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी सपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments