Seed application process begins : बियाण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
नांदेड| खरीप हंगाम सन 2025 मध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थानी पिक प्रात्यक्षिकाच्या लाभासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यांसाठी आजच महाडीबीटीवर अर्ज करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
खरीप हंगाम सन 2025 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर, मुग व उडिद पिकांसाठी (10 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकासाठी (5 वर्षाच्या आतील अधिसुचित वाण) योजनेअंतर्गत पिक प्रात्यक्षीकांसाठी 31 मार्च 2024 च्या पुर्वी नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी बियाण्यासा...
