Homeक्राईमवाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारकांकडून 1,39,82400/-रुपये दंड आकारण्यात आला -NNL

वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारकांकडून 1,39,82400/-रुपये दंड आकारण्यात आला -NNL

नांदेड। शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दुर करण्यासाठी व बेशिस्त व वाहतूकीचे नियम मोडणा- या वाहन चालकावर कारवाई करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब व मा. अपर पोलीस श्री. अधीक्षक अविनाश कुमार साहेब यांनी वेळोवळी शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांना आदेशित केले होते. मा. वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. साहेबराव गुट्टे शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी शहरात

वाहतूकीचे नियम मोडणा-या 13014 वाहन चालकावर कारवाई करुन त्यांचेकडून 1,39,82400/-रु (एक कोटी एकोणचाळीस लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपय) दंड केला शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी लोकसभा निवडणुक- 2024 अनुषंगाने नांदेड शहरात VVIP प्रचार सभा बंदोबस्त, निवडणुक बंदोबस्त, तसेच रमजान ईद, श्री रामनवमी, डॉ. बाबासाहेच आंबेडकर जयंती महत्वाचे बंदोवस्त करीत असतांना दि. 12/03/2024 ते दि. 05/06/2024 या कालावधीत शहरात वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहन धारकावर कारवाई करुन त्यांच्यावर एकूण 13014 केसेस करण्यात आल्या.

त्यांच्याकडून एकूण 1.39.82400/-रु (एक कोटी एकोनचाळीस लाख बायंशी हजार चारशे रुपय) दंड करण्यात आला. त्यापैकी 3343 वाहनधारकाकडून 18,45,950/-रु (आढरा लाख पंचेचाळीस हजार नऊसे पन्नास रुपय) दंड वसूल करण्यात असून शासनास भरणा करण्यात आलेला आहे. नांदेड शहर वाहतूक शाखेकडून नांदेडकरांना आव्हान करण्यात येते की, आपण वाहतूक नियमांचे पालन करुन नांदेड ट्रॉफीक मुक्त करा. यापुढे वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारका विरुध्द कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments