Friday, May 15

Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड,हदगाव,हिमायतनगर,अनिल मादसवार। हदगाव तालुक्यातील तामसा येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचे दर्शन घेण्याचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मी सर्व समाज बांधवांचा आभारी आहे. येणाऱ्या काळात भाविक भक्तांना बसण्यासाठी निवारा व्हावा यासाठी निधी उपलब्ध करून सांभागृह बांधून देणार असल्याची घोषणा हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली.

IMG 20250502 220823 Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार - आमदार बाबुराव कदम कोहळीकर

ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे तामसा येथील श्री लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्राणप्रतिष्ठाण सोहळा वर्धपान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या मंदिराचा कलशारोहण सोहळा प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना मंचावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. शुक्रवार दिनांक 02 में रोजी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, योगीराज गुरु बापू, महंत विरागीदास महाराज यांच्यासह अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचा कलशारोहन सोहळा थाटात संपन्न झाला.

IMG 20250502 131654 Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार - आमदार बाबुराव कदम कोहळीकर

यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित होऊन भगवान श्री लक्ष्मीनृसिंह मूर्तीच मनोभावे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी उपस्थित सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या, तसेच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी आगामी काळात सभागृह बांधून देण्याचे आश्वासन दिलं. याप्रसंगी दासरी माला दासरी समाजाच्या वतीने यंगलवार परिवारातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत सन्मान करण्यात आला.

IMG 20250502 131739 Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार - आमदार बाबुराव कदम कोहळीकर

IMG 20250502 221748 Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार - आमदार बाबुराव कदम कोहळीकरयावेळी पुढे बोलताना आमदार कोहळीकर म्हणाले की, मी व आमचे कुटुंब 25 वर्षांपूर्वी कमांडर जीपमधून तिरुपती बालाजी मंदीर दर्शनासाठी जाताना आम्ही तेलंगणा राज्यातील नृसिंह मंदिर परिसरातील माळाच्या पायथ्याशी थांबलो आणि तिथे स्वयंपाक करून जेवन केलं. तिथे नारायणाची भक्ती करणाऱ्या भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू ने कडेलोट केले होते ते स्थळ होते. तिथून तीन किलोमीटर भगवान नृसिंह मंदिर होत, रात्र झाल्यामुळे दर्शनासाठी पोहचू शकलो नाही.

IMG 20250502 131531 Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार - आमदार बाबुराव कदम कोहळीकर

सांगायचं एव्हढंच की, आपल्या मतदार संघात जवळपास कुठं नृसिंह मंदिर नाही, सर्व समाज बांधव आणि व्यापाऱ्यांनी तामसा येथे 2015 मध्ये नृसिंह मंदिर उभारले आज सर्वांच्याच साक्षीने कलशारोहन सोहळा संपन्न झाला. मला देखील श्री लक्ष्मी नृसिंह दर्शनाचा योग जुळून आला असं म्हणत आमदार महोदयांनी सर्व भाविक भक्त समाज बांधवाना मनापासून शुभेच्छा दिल्या.

IMG 20250502 220839 Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार - आमदार बाबुराव कदम कोहळीकर

IMG 20250502 221736 Mla Baburao Kadam ; नृसिंह दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी सांभागृह बांधून देणार - आमदार बाबुराव कदम कोहळीकर

कलशारोहन निमित्ताने दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते, दिनांक 01 में रोजी शहरातील मुख्य रस्त्याने कलश मिरवणूक काढण्यात आली, रात्री कीर्तन सोहळा संपन्न झाला. दिनांक 02 रोजी सकाळी 5 दाम्पत्यांनी सपत्नीक होम हवन पूजा केल्यानंतर श्री लक्ष्मी नृसिंह मंदिराचा कलशारोहन सोहळा थाटात संपन्न झाला. त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी निळू पाटील, बाळासाहेब कदम, लांडगे मामा, माजी जी प सदस्य श्री बास्टेवाड, दासरी माला दासरी समाजाचे अध्यक्ष मुरहारी यंगलवार, यांच्यासह समाजाचे पदाधिकारी, सर्व समाजातील लेकीबाळीं आणि भाविक भक्तांनी उपस्थित होऊन धार्मिक सोहळ्याची शोभा वाढवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!