HomeनांदेडVarad Vinayak temple : अंगारिका चतुर्थी निमित्त वाढोणा येथील श्री वरद विनायक...

Varad Vinayak temple : अंगारिका चतुर्थी निमित्त वाढोणा येथील श्री वरद विनायक दर्शनाला भक्तांची गर्दी

हिमायतनगर, अनिल मादसवार| अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री वरद विनायक मंदिरात भक्तांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भाविकांनी श्री वरद विनायकाचे (Shri Varad Vinayak temple) दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त केल्या. तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.

वर्षातून एक वेळा येणाऱ्या अंगारिका चतुर्थीचे औचित्य साधून इच्छापूर्ण झालेल्या गणेशभक्त भाविकांकडून पुरोहित परमेश्वर बडवे गुरु यांच्या मधुर वाणीमध्ये अनेक गणेशभक्तांनी श्री वरद विनायकाचा अभिषेक पूजा केली. तसेच उपस्थित भाविकांना प्रसाद विपरीत करून गणरायाची कृपा मिळविण्याची कामना केली. अनेकांनी वरद विनायकला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातीन महिला भक्तांनी पाई यात्रा करत वरद विनायकाचे दर्शन घेतले. एकूणच दिवसभर मंदिर परिसर गणपती बाप्पा मोरयाच्या भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता.

श्रावण महिन्यात आलेल्या अंगारिका चतुर्थीच्या (Angarika Chaturthi) दिवशी वरद विनायक दर्शनाला अनन्य साधारण महत्व असून, याचे औचित्य साधून येथील भाविक प्रवीण मामीडवार यांच्या वतीने भक्तांना फराळ प्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. मागील काही काळात वराड विनायक मंदिर परिसराचा करण्यात आलेला विकास व तलावाचे सुशोभीकरण यामुळे मंदिर परिसराचे निसर्गरम्य वातावरण भाविकाना आकर्षित करत आहे.

येथील वरद विनायक मंदिर हे पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या ॐ अकराच्या चंद्राच्या बिंबावर वसलेले असून, संत पाचलेगावकर महाराज यांनी येथे भेट दिल्यानंतर वरद विनायकाची मूर्ती बाहेर काढून गणेश भक्तांच्या पुढाकारातून वरद विनायक मंदिराचा जीर्णोद्धार गुरुवर्य लाखने महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. त्यानंतर अष्टभुजाधारी वरद विनायकाची मूर्ती मोठ्या कसोटीने नेऊन विधिवत स्थापना करण्यात आली. तेंव्हापासून येथील नवसाला पावणाऱ्या इच्छापूर्ती वरद विनायक गणपती दर्शनासाठी विदर्भ मराठवाडा व अन्य ठिकाणाहून भाविक भक्त दर महिन्याची संकष्टी चतुर्थी, अंगरिका चतुर्थी, गणेश चतुर्थी सह दररोज भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. नवसाला पावणारा वरद विनायक म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या अष्टभुजाधारी गणपती बाप्पाला भाविक साकडे घालतात आगामी गणेशोत्सव काळात वराड विनायक दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments