Police Raid ; जोशीसांगवी येथे विना परवाना दारू विक्री करणाऱ्यावर पोलीसांची धाड ,एका ईसमास केली अटक

उस्माननगर, माणिक भिसे।उस्माननगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या लोहा तालुक्यातील जोशी सांगवी दोन ठिकानी अवैध मार्गाने विना परवाना देशी दारू विक्री करणा-या दोघावर कारवाई करण्यात आली त्या मधून एका ईसमास अटक केली आहे.

उस्माननगर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डाॅ.सौ. लोपामुद्रा दत्तराव आनेराव व पो हे काॅ कुबडे यांनी पोलीस अधीक्षक नांदेड, अबिनाश कुमार ,कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप व उस्माननगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात विनापरवाना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेशा प्रमाणे यांनी लोहा तालुक्यातील मौजे जोशी सांगवी येथील तांडा येथे जय सेवालाल किराणा स्टोअर्स येथे देशी दारूची अवैध रित्या विना परवाना दारू विक्री करीत आहे.

अशी गुप्त माहिती मिळताच दि.२८ एप्रिल रोजी किराणा दुकानावर येथे धाड टाकून ३३६० रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला. जोशी सांगवी तांडा येथील जय सेवालाल किराणा स्टोअर्सचालक हा दुकानातील कोपऱ्यामध्ये किशन खेमा राठोड वय ५५ वर्ष हे विनापरवाना देशी दारू विक्री करीत असताना पकडण्यात आले सदर बाॅक्सची झडती घेतली आसता खालील गुन्ह्याचा माल १८०ml क्षमतेच्या ४८ बाॅटल एकूण ३३६० रू. जप्त करण्यात आला.

तर दुस-या गुन्ह्यात जोशीसांगवी येथील राजीव मलदोडे यांच्या घरात देशी दारूची चोरटी विक्री करीत आसल्याची माहिती मिळाल्यानंतर खाजगी वहानाने सदरील ठिकाणी छापा टाकून पत्राच्या घरात एक पांढ-या नाॅयलान पिशवीमध्ये देशी दारू असल्याचे निदर्शनास आले.घरामध्ये देशी दारू बाळगणाचा परवाना विचारपूस केली आसता परवाना नसल्याचे सांगीतले.पंचासमक्ष सदर नाॅयलान पिशवीची झडती घेतली असता कागदी लेबल आसलेल्या देशी दारू भिंगरी संत्र्याच्या ९० ml क्षमतेची प्लास्टिक ४८ बाॅटल मिळून आले.

त्यांची अंदाजीत किंमत १६८० रू.गुन्ह्याचा माल विनापरवाना बेकायदेशीर रित्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात ठेवलेला माल मिळून आला म्हणून सदर दोन्ही आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई )कायदेशीर फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे ह्या गुन्याचा तपास वरिष्ठ अधिकारी व सपोनि मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ कुबडे हे करीत आहेत .

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button