HomeनांदेडMLA Chikhlikar : लोहा उप रुग्णालयाचा बेभरवशाची रुग्ण सुविधा :आमदार चिखलीकरांची थेट...

MLA Chikhlikar : लोहा उप रुग्णालयाचा बेभरवशाची रुग्ण सुविधा :आमदार चिखलीकरांची थेट राज्याच्या आरोग्य सचिवाकडे तक्रार

लोहा| लोहा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून वैद्यकीय अधीक्षक ,डॉक्टर मुख्यालयी राहत नाहीत वेळेवर रुग्णालयाला उपचार मिळत नाहीत .अनेक रुग्ण नातेवाईक दररोज थेट प्रतापरावांना दवाखान्याच्या तक्रारी करत असतात.असुविधा , तक्रारीचा ढीग , डॉक्टर वेळेवर नसतात त्यामुळे येथे उपाचाराला येणारे लोक त्रस्त झाले आहेत .त्याची दाखल घेत रविवार दुपारी आमदार प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली.असुविधा व तक्रारी पाहता स्वतः राज्याच्या आरोग्य सचिवाला येथील वैदयकीय अधीक्षक व डॉक्टर याची बदली करा असे सूचित केले. जिल्हाशक्यचिकित्सक यांनी लक्ष घालावे तसेच पाण्याची तात्काळ सुविधा करण्याचे निर्देश दिले.

लोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढत्या तक्रारीची दाखल घेत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रविवारी दवाखान्याच्या भेट दिली .,उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीळकंठ भोसीकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अब्दुल बारी, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, माजी सभापती खुशाल पाटील पांगरीकर ,माजी उपनगराध्यक्ष दता वाले ,भास्कर पाटील , पंचशील कांबळे डॉ लोहारे, बी डी जाधव, यासह कर्मचारी उपस्थिती होते.

लोहा रुग्णालयात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे .वैद्यकीय अधीक्षक राहत नाहीत आणि डॉक्टर वेळेवर नसता त्यामुळे रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत .अनेकदा रुग्ण नातेवाईकांनी आमदार चिखलीकर याच्याकडे डॉक्टर नाहीत .कोणीच पाहिनात . पाण्याची सोय नाही असा अनेक तक्रारी केल्या त्याची तातडीने दाखल घेत स्वतः रखरखत्या उन्हात रविवारी दुपारी आमदार प्रतापराव यांनीं उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.

IMG 20250427 WA0042 MLA Chikhlikar : लोहा उप रुग्णालयाचा बेभरवशाची रुग्ण सुविधा :आमदार चिखलीकरांची थेट राज्याच्या आरोग्य सचिवाकडे तक्रार

असुविधा पाहून त्यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री यांचाच फोन केला त्यानंतर राज्याचे आरोग्य सचिव याना लोहा उपजिल्हा रुग्णालय म्हणजे राज्यातील सर्वात असुविधा देणारे हॉस्पिटल आहे . येथील वैदयकीय अधीक्षक यांना तात्काळ बदला तसेच डॉक्टर स्टॉप अन्यत्र बदली करा .माझ्या भागातील जनतेला आरोग्य सेवा मिळत नाही . यावर तातडीने कार्यवाही व्हावी असे सांगितले . जिल्हा शक्य चिकित्सक डॉ नीळकंठ भोसीकर यांना या रुग्णालयाकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या एका हंगामी डॉक्टर बाबत जाहीरपणे निर्देश दिले.

रुग्णालयात पाण्याची सोय नाही त्यावर तात्काळ उपाय योजना करा व पाण्याची सोय तात्काळ सुविधा उपलब्ध व करावी असे मुख्याधिकारीश्रीकांत लाळगे याना निर्देश दिले .लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालया च्या सुविधा बाबत येत्या। आठवड्यात मुंबईत आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेऊ व येथील रुग्णालयात अद्यावत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करू असे आ चिखलीकर यांनी आश्वासित केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments