Friday, May 15

Shri Hanuman Janmotsav : श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने वाढोणा शहरात २८ रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोणा (हिमायतनगर) जिल्हा नांदेड येथे सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ दुपारी २.३० वाजता शहरातील पोलीस स्टेशन बाजुस असलेल्या बाजार चौक परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे भव्य हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्याने विविध प्रकारच्या झाकीसह भव्य शोभा यात्रा काढली जाणार आहे.

।। देव देश धर्म ।। टिकला पाहिजे आणि हिंदू संस्कृतीचे अबाधित राहिली पाहिजे हा उद्देश ठेऊन हिमायतनगर वाढोणा शहरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचे मुख्य आकर्षण भजन सम्राट श्री विकास भैय्या परदेशी श्री बागेश्वर धाम सत्संग भजन मंडळ, नांदेड हे राहणार असून, शोभा यात्रेत श्री हनुमान जन्मोत्सव समिती-वाढोणा तर्फे प्रभु श्रीराम लल्ला झांकी, बाहुबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, गौमाता राष्ट्रमाता झाकी, भजन मंडळ ट्रॉला आणि रिध्दम लाईव्ह साउंड, नांदेड यांचा सहभाग राहणार आहे. ईहासात पहिल्यांदाच हिमायतनगर येथे भव्यदिव्य अश्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हि शोभा यात्रा दिनांक २८ रोजी दुपारी २.३० वाजता काढली जाणार असून, याच उद्घाटन सर्व साधु संत व माऊली च्या हस्ते होणार आहे.

या उत्सव सोहळ्यात आणि शोभायात्रेत शहरासह हिमायतनगर तालुक्यातील पंचक्रोशीतील हिंदू माता- भगिंनी व युवा आणि जेष्ठ मंडळींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक श्री हनुमान जन्मोत्सव संमिती, विश्व हिंदु परिषद बजरंग दल, सकल हिंदु समाज, संत मुक्ताई हरिपाठ महिला मंडळ, दुर्गा भजनी मंडळी कालिंका गल्ली, श्री स्वामी समर्थ केंद्र वाढोणा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!