
नांदेड l नांदेड जिल्हा हे चळवळीचे केंद्र बिंदू असुन या जिल्ह्यात प्रत्येक महापुरुषांच्या आदर्शाने सर्व समाजातील समाज बांधव आप आपली चळवळ चालवत असतात, प्रकर्षाने नांदेड शहरात अनेक महापुरुषांचे स्मारकं आहेत परंतु शहरात कुठेही छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक नाही. या अनुषंगाने आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुल सावे साहेब हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले असता सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली, की महामानवांच्या विचारांना त्यांच्या स्मृतीला किमान जयंती पुण्यतिथी च्या दिनी तरी अभिवादन करण्यासाठी त्यांचे स्मारक हे शहरात असणे गरजेचे आहे.


नांदेड शहर हे शिक्षणाचे हब बनले असुन या शहरात शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावातून तसेच अनेक ग्रामीण भागातून कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनी येत असतात अशा शालेय व महाविद्यालयीन जिवनात ज्या महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या स्मृतीना आपण उजाळा देतो.

त्यांचाच प्रभाव आपल्या भविष्यावर पडत असतो मग अशा वेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रखर शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास तमाम नांदेडकरांच्या जिवनाला भेदावा त्यांच्या प्रचंड त्यागाला बलिदानाला चिरंतर स्मरून त्यांना अभिवादन करता यावं यासाठी नांदेड शहरात भव्य असं छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक उभं राहावं अशी इच्छा तमाम नांदेड करांची आहे, यावर आपण पालकमंत्री म्हणुन योग्य ती भुमिका घेत येत्या 14 मे 2025 पर्यंत म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती पर्यंत नियोजित जागा पाहुन त्याचे भूमिपूजन करावं अन्यथा येत्या काळात नांदेड जिल्ह्यातील शिव-शंभूराजे भक्तांकडून महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल.


यावेळी निवेदनावर दशरथ पाटील कदम,श्याम पाटील वडजे,सुभाष पाटील कोल्हे,संकेत पाटील, सुनिल पाटील कदम,दिलीप पाटील दळवे, नवनाथ जोगदंड यांच्या स्वाक्षरी आहेत.




