HomeनांदेडDr. Babasaheb Ambedkar : उस्माननगर येथे भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त ठिक ठिकाणी डॉ....

Dr. Babasaheb Ambedkar : उस्माननगर येथे भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त ठिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

उस्माननगर, माणिक भिसे l भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.

उस्माननगर ता.कंधार येथील नागवंशीय मित्रमंडळाकडून उस्माननगर बसस्थानक शेजारी ग्रामपंचायत कार्यालय समोर डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नियोजित ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले . तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण माजी सरपंच तु.श.वारकड गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर बौद्धाचार्य अंगुलीमाल सोनसळे यांच्यासह सार्वजनिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

वंदना झाल्यानंतर बौद्ध अनुयायांकडून अन्नदान ( खिचडी )चे वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी स.पो.नि. महेश मुळीक , माजी सरपंच तु.श.वारकड गुरूजी , देवराव सोनसळे ( संचालक ), मुख्याध्यापक तथा माजी उपसरपंच राहुल सोनसळे , उपसरपंच बाशीदभाई शेख, शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर, सामाजिक कार्यकर्ते मारोती घोरबांड ,शासकीय गुत्तेदार दत्ता पाटील घोरबांड, सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच प्रतिनिधी अमिनशाह फकिर , माजी जि.प.सदस्य माधवराव भिसे ,गंगाधर भिसे ,वामण लोंढे सर ,गोविंद भिसे, नरेश शिंदे , पोलीस पाटील विश्वभंर मोरे ,रोहीदास कांबळे ,गणेश लोखंडे ,सुर्यकांत मालीपाटील ,लक्ष्मण कांबळे आदि अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील कांबळे अंकुश कांबळे , धम्मानंद कांबळे ,राहुल सोनसळे ,गुरूनाथ कांबळे व उत्सव समितीचे अधिकारी ,पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. बौद्ध उपासक ,उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.अशोक प्राथमिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

जवाहरलाल ने.वि.वसतीगृहाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त वसतीगृहाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते प्रतिमचे पुजन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, विठ्ठल पाटील ताटे ,
सम्यक कांबळे, रोहीदास कांबळे,सौ.सविता कांबळे,सुप्रिया कांबळे व वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.

उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात उस्माननगर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक महेश मुळीक व प्रा.डॉ. उमाकांत तुंबरफळे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे, सुर्यकांत मालीपाटील, देविदास डांगे , राजीव अंबेकर, सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे, पोलीस पाटील विश्वभर मोरे, लक्ष्मण कांबळे ,अमजद पठाण, लक्ष्मण भिसे, ग्रामपंचायत सदस्य अंगुलीमाल सोनसळे ,पोलीस कर्मचारी अनिरूद्ध वाडे रेजितवाड ,वरपडे ,तिडके आदी उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह उस्माननगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती अभिवादन करून साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.विजय भिसे,छत्रपती भिसे ,प्रा.रूपेश भिसे ,ॲड.साहेबराव भिसे ,राजेश भिसे ,माधव भिसे, धम्मानंद कांबळे ,गोपाळ भिसे,तेजस भिसे ,विजयकुमार भिसे ,अरविंद भिसे ,रवि सोनटक्के ,रवि हराळे , बंटी भिसे ,गजानन भिसे ,आनंदा भिसे ,विजय परसराम भिसे , व अनेक बालक उपस्थित होते .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments