HomeनांदेडNanded Waghala ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेवर सर्व मान्य आदर्श...

Nanded Waghala ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेवर सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय निवडणूक, 13 जागी उमेदवार विजयी

नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये सत्ताधारी सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय होऊन तेरा जागेवर तेरा विजयी उमेदवार विजयी झाले असुन विरोधी असलेल्या परिवर्तन पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय सभासद बांधवासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सभासदांनी पुन्हा सत्ताधारी ताब्यात पतसंस्था ताब्यात दिली आहे.निवडनुक निकाल लागताच फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून जल्लोष व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर मनपा मुख्यालय समोर विजयी उमेदवार व समर्थकांनी पॅनल प्रमुख दयानंद गायकवाड, गणेश नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य जल्लोष साजरा करून मिठाई वाटप केली.

नावा मनपा कर्मचारी सह पतसंस्थेची 13 एप्रिल रोजी 13 जागेसाठी साठी 27 उमेदवार निवडणूक रिंगणात होते या निवडणुकीत सर्व मान्य आदर्श विकास पॅनल व परिवर्तन पॅनल अशा दोन पॅनल एक अपक्ष उमेदवार मध्ये निवडणूक सकाळी 8 ते 4 दरम्यान मनपा‌ शाळा क्रमांक 1 वजिराबाद नांदेड येथे तिनं मतदान केंद्रावर संपन्न झाली, जवळपास 825
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सायंकाळी झालेल्या मतमोजणी मध्ये सर्व मान्य आदर्श पॅनलला एकतर्फी बहुमत मिळवून 13जागे पैकी 13जागेवर विजयी झाले तर परिवर्तन पॅनल एकही जागा मिळाली‌ नाही.

सर्वमान्य आदर्श विकास पॅनलचे सर्वसाधारण गटातील ऊमेदवार कानोटे शाम गंगाराम 491, कोल्हापूरे‌ सतपाल सिंघ रणजितसिंघ516 ,जमील अहेमद म.वजिर459,जाधव रणजित नारायण 493, जौधंळे साहेबराव विठ्ठलराव‌526, बनसोडे सुमेध भगवान496,स.जाकेर अली मेहमूद अली सयद ,468 सोनकांबळे विशाल‌ बालाजी497, अनुसूचित जाती जमाती राखीव वंदने‌ दिलीप वामनराव 532,महिला राखीव घुले‌ आशाबाई सुग्रिव538,पतेवार‌ निर्मला पोतन्ना533,भटक्या विमुक्त जाती जमाती नागरगोजे गणेश वामनराव‌ 584, ईतर मागासवर्गीय राखीव स्वामी ओंकार दिगंबर518 हे ऊमेदवार विजयी झाले.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचे प्रमुख दयानंद गायकवाड व गणेश नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून मिठाई वाटप करून विजयी उमेदवार यांच्ये पुष्पहाराने स्वागत करून अभिनंदन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

निवडणूक अधिकारी म्हणून एच.आर.येवते यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक बि.एन.गायकवाड,
मतदान केंद्र अध्यक्ष एस.एस,झळके जि.यु.कुटे, बि.बी.बोधगिरे, व कर्मचारी यांनी काम पहीले तर वजिराबाद पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्र येथे पोलीस अमलदरांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments