Homeक्राईमRohyo's Technical Assistant ; रोहयोच्या तांत्रिक सह्हायकाचा मणमाणी कारभार गटविकास अधिकारी यांची...

Rohyo’s Technical Assistant ; रोहयोच्या तांत्रिक सह्हायकाचा मणमाणी कारभार गटविकास अधिकारी यांची पाठराखन!

श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर l शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून नानाविध योजना अनुदानावर राबविण्यात येतात. यामागे शेतकरी समृद्ध व्हावा,हा उद्देश असतो.पंचायत समिती माहूर अंतर्गत असलेल्या गुडंवळ येथील शेतकऱ्यांना गुरांचे गोठे बांधकाम करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. परंतु तांत्रिक सह्हायक (रोहयो) आर.जि.गोणेकर हे दोन महिन्या पासून जिओ टॅकिंग आखणी करून देत नसल्याने गोठ्यांचे बांधकाम रखडले आहे.

२००५ पासून संपूर्ण राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर, शेत रस्ते, शिवरस्ते, जनांवरचा गोठा, फळबाग लागवडीसाठी अनुदान यासह विविध कल्याणकारी योजना सरकारने सुरू केले आहेत. मात्र प्रशासनातिल काही काम चुकारू कर्मचारी मुळे योजनेला गालबोट लागत आहे.

गुंडवळ येथील शेतकरी सौ.कमलाबाई ठाकुर यांनी
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्रच्या संयोजनातून असलेल्या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना गुराढोरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान करीता रोजगार हमी योजने अंतर्गत गुरांच्या गोठ्यांची शासनाच्या नियमानुसार .

लाभार्थ्यांची ग्रामपंचायतीने निवड केली लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र दिले . तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून गाई, म्हशी व तत्सम जनावरे असल्याचा दाखला दिला. व पंचायत समिति कडून दि,४ फेब्रेवारी रोजी प्रशासकीय व कार्यरंभ आदेश मिळूनही तांत्रिक सह्हायक (रोहयो) आर.जि.गोणेकर हे जिओ टॅकिंग करून देत नसल्याने गोठ्यांचे बांधकाम रखडले आहे, या बाबत गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना भेटून सागितले असता तेहि याकडे दुर्लक्ष करून पाठिशी घालत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments