Memorendam ; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

हिमायतनगर। वाढोणा शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतिने औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवीण्यात आले आहे, यावेळी मोठया प्रमाणावर हिंदू बांधव उपस्थित होते.

ज्या औरंगजेबने धर्मवीर शंभुराजेंची हत्या केली, गुरू तेघबहादर,गुरू गोविंदसिंहांच्या मुलांची हत्या केली, हिंदु मंदिर उद्ध्वस्त केल अशा क्रूरकर्मा राजाची कबर राहने म्हणजे हिंदुस्थानातील हिंदुच्या कपाळी गुलामीचे डाग राहिल. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर औरंगजेबची कबर हटवावी अन्यथा बजरंग दलाच्या वतीने लाखो हिंदुना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील आणि कारसेवा करून कबर तोडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे किनवट जिल्हा अध्यक्ष श्याम रायेवार, बजरंग दल वाढोणा तालुका अध्यक्ष सोपान भाऊ कोळगीर, बजरंग दल तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ लिंगमपल्ले, बजरंग दल गोरक्षा प्रमुख वाढोणा देवा भाऊ चर्लेवार, बजरंग दल शहर अध्यक्ष शुभम नरवाडे, परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, प्रविण जन्नावार, आशिष सकवान, रामभाऊ सुर्यवंशी, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन चायल, सुमित कांगणे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, विपुल दंडेवाड, दुर्गेश मंडोजवार, ओमकार चर्लेवार, प्रविण हानवते, गणेश रामदिनवार, गजानन हारडपकर, अक्षय राहुलवाड, गुंफलवाड , ओमकार, पांचाळ, आकाश जंगेवाड, श्रीश गुंडेवाड, प्रदिप जिठ्ठेवाड व विश्व हिंदु परिषद, बजरंग दल,भाजपा शिवसेना, सर्व हिंदुत्वादी संघटनेच पदाधिकारी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button