NCP group ; माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या समवेत सिडको परिसरातील अमोल‌ व पवन‌ जाधव व युवकांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश

नवीन नांदेड l सिडको परिसरातील अनेक युवक कार्यकर्ते माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या समवेत अजितदादा पवार राष्ट्रवादी गटात जाहीर प्रवेश करणार असुन त्यांच्या सोबत अमोल अशोकराव जाधव,व पवन अशोकराव पाटील जाधव मित्र परिवार सिडको यांच्या नेतृत्वाखाली ओम गार्डन जुना कौठा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

गेल्या अनेक वर्षा पुर्वी कै.अशोक जाधव हे वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष असतांना वेळोवेळी आंदोलने व विकासासाठी केलेल्या कामाची नोंद आजही परिसरात असुन त्यांच्या अकाली निधनां नंतर त्याचा मुलगा अमोल जाधव हा राजकारण मध्ये प्रवेश करुन वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी व नांदेड शहर महासचिव पदावर कार्यरत असताना अनेक विकासात्मक कामासह , प्रलंबित प्रश्न सोडविले आहे, सार्वजनिक क्षेत्रातील केलेल्या कार्य पाहून व गेल्या पाच वर्षांपासून आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या माध्यमातून केलेलं.

कार्य पहाता त्याचा सोबत जाधव‌ परिवार सदैव कार्यरत राहण्यासाठी अमोल व‌ प्रविण जाधव हे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सोबत 28 फेब्रुवारी 25 राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार असुन यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर,शहर अध्यक्ष जिवन पाटील घोगरे व मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन नांदेड भागातील आदिनाथ दरेगावे,सिद्धेश जाधव चेतन चालीकवार ,निखिल शिंदे सोफियान ,देशमुख सौरभ, चालीकवार, सूर्यकांत पांचाळ, बसवेश्वर गाडे, पुरभाजी भोंग, धनंजय अटकोरे सूर्यकांत इबिते, करन नकितवाड, साई बेजगमवार , वीर पांचाळ ,राजू पुरी ,सोहम देऊळगावकर, वैभव डहाळे.

 

अक्षय डहाळे ,रामेश्वर मोरताटे, रोशन डांगे ,अजिंक्य जोशी,सिद्धेश्वर मोटारगे ,आकाश धंपलवार ,गौरव शहाणे, केतन कदम,दत्ता क्कबनूरे चंद्रकांत ऐकाळे, शैलेश एकलरे , ऋषिकेश एकलरे ,शुभम ढगे,राजू पाटील चौंडकर ,बाबुराव पुयड हे युवक प्रवेश करणार आहेत. आगामी होणाऱ्या निवडणुकीत व‌ नवीन नांदेड भागात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button