
उस्माननगर l कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण येथील शिवारात २३ रोजी पिसाळलेल्या रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २५ रोजी पहाटे रमेश शिंदे वय ४५ या शेतकऱ्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.


सविस्तर महीती अशी की, येथील दोन शेतकऱ्यावर दि.23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता शेतात गु्रांसाठी चारा घेत असताना हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती . यामध्ये बापूराव पवार आणि रमेश किशन शिंदे हे गु्रांसाठी चारा घेत होते तितक्यात पिसाळलेल्या रानडुकरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

यात त्यांच्या मांडीला व पाठीला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. शेतात त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी धावून आले असता त्यांनी त्यांची रान डुकर कडून सुटका केली. उपचारासाठी नांदेड येथील येथे शंकरराव चव्हाण वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागते त्यामुळे रानडुकरांचा फार उपद्रव होतो व पिकाचेही नुकसान होत असल्याने वनविभागाने त्यांचा बंदोबस्त करावा आशी मागणी होत आहे.


कंधार तालुक्यातील शिराढोण येथील शेत शिवारामध्ये शेतात काम करणाऱ्या दोन शेतकऱ्यावर दि.23 फेब्रुवारी दुपारी 4च्या सुमारास रानडुकराने हल्ला करून शरीराचे अक्षरशः लचके तोडून, सुमारे आठ ते दहा ठिकाणी चावा घेत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यानंतर जखमी शेतकऱ्यास तातडीने उपचारासाठी नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रात्री उशिरा शेतकऱ्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. पण उपचार चालू असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, आता वनविभागाची यंत्रणा कुचकामी असल्याची ओरड शेतक यांतून घेताना दिसत आहे.
परिसरातील माळरानात वनविभागामार्फत वन्यप्राण्याच्या सोयीसाठी पाणवठेही नसल्याने प्राण्यांची व्यवस्थाही रामभरोसे असल्याचे चित्र आहे. यामुळे वन्य प्राणी पाणी व चारा साठी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. शिराढोण परिसरातील वनविभागाच्या आरक्षित क्षेत्रात लाखो रुपयांची झाडे लावण्यासाठी केलेला खर्च झाडे पूर्णत: वाळल्याने पाण्यात गेल्याचे चित्र आहे.
एकीकडे शेतकरी दुष्काळाशी दोन हात करून लढत असताना परिसरातील वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षणासाठी दमछाक होताना दिसून येत आहे. परंतु वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून वन्य प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.



