Friday, May 15

Special Train for Holi : होळी निमित लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

नांदेड| होळी निमित होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 01105 / 01106 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हजूर साहिब नांदेड दरम्यान विशेष गाडीच्या दोन फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. या विशेष गाड्या पुढील प्रमाणे धावतील.

गाडी क्रमांक 01105 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हजूर साहिब नांदेड: हि विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 12 आणि 19 मार्च 2025 रोजी मध्य रात्री 00.50 वाजता सुटेल आणि ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे नांदेड येथे त्याच दिवशी रात्री 21.00 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01106 हजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई : हि विशेष गाडी हजूर साहिब नांदेड येथून दिनांक 12 आणि 19 मार्च, 2025 रोजी रात्री 22.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच (परभणी-लातूर-पुणे मार्गे) लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 16.05 वाजता पोहोचेल. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले असून, या गाडीत जनरल, वातानुकुलीत, स्लीपर असे एकूण 22 डब्बे असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!