Homeनांदेडexam centers ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 परिक्षा केंद्रावर दहावी परिक्षांना‌...

exam centers ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 परिक्षा केंद्रावर दहावी परिक्षांना‌ सुरूवात

नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ लातूर विभागाच्या वतीने दहावी शालांत परिक्षांना ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत 14 केद्रांवर 21 फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे,परिक्षा केंद्रावर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी हायस्कूल सिडको,जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय विष्णुपुरी,
कुसुमताई माध्यमिक विद्यालय सिडको ,इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय सिडको, महात्मा गांधी महाविद्यालय सिडको, शिवशक्ती माध्यमिक विद्यालय काकांडी.

श्री.मधुबन महाराज विद्यालय धनेगाव, राष्ट्रमाता मराठी उर्दू माध्यमिक विद्यालय वाजेगाव,
शिवाजीराव पाटील हायस्कूल वाजेगाव,शांती निकेतन पब्लिक स्कूल सिडको,महात्मा फुले पोस्ट बेसिक अश्राम शाळा‌ वाघाळा, माधवराव वटेमोड विघालय जुना कौठा,नरहर कुरुंदकर महाविद्यालय जुना कौठा, गोदावरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव निमजी या केंद्रावर परीक्षांना सुरूळीत सुरूवात झाली असून पहिल्या दिवशी शिवाजी हायस्कूल केंद्रावर परिक्षार्थी यांच्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

केंद्रप्रमुख म्हणून जि.बी.ढवळे, एस.पी.पांडे, एन.एम.वडजे, जाधव,एस.पी.श्रीमती आडे. एस.बी, विजय वाघमारे, पाटील व्हि.एस, कंकरे.ए.के, एम.ए.खदीर, सौ .शळके, एस.एल.डॉ.ए.डी.गरड, जि.एस.मंहमद मुखेडकर, भगवान वटेमोड यांच्यी नियुक्ती करण्यात आली होती, भरारी ,बैठे पथक यांनी परिक्षा केंद्रावर भेटी दिल्या असल्याचे वृत्त असुन तणाव मुक्त व‌ कॉपी मुक्त वातावरणात परिक्षाना प्रारंभ झाला‌ आहे.परिक्षा केंद्रावर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शना खाली एक अधिकारी पोलिस अंमलदार,महिला पोलिस कर्मचारी होमगार्ड व‌ महिला होमगार्ड यांच्या नियुक्ती करण्यात आली होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments